ETV Bharat / city

डॉक्टरला कोरोना; अमरावतीच्या वडाळी परिसरात भितीचे वातावरण

author img

By

Published : May 18, 2020, 8:38 AM IST

शुक्रवारी सिंधनगर भागात राहणाऱ्या एका डॉक्टरला कोरोना झाल्याचा अहवाल समोर आला होता. सदर डॉक्टर हा कोरोनाबाधित असून त्याचा प्रतिबंधित क्षेत्र घोषित असणाऱ्या ताज नगर परिसरात दवाखाना सुरू होता. यासोबतच ताज नगरपासून सुमारे 12 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वडाळी परिसरातही या डॉक्टरचा दवाखाना सुरू होता. सकळी ताज नगर आणि दुपारपासून रात्री 10 वाजेपर्यंत वडाळी परिसरात डॉक्टर रुग्ण तपासत होते.

amravati corona
amravati corona

अमरावती - शहरातील वडाळी परिसरात दवाखाना असणाऱ्या एका डॉक्टरला कोरोना असल्याचे स्पष्ट होताच वडाळी परिसरात खळबळ उडाली आहे. परिसरातील अनेक रुग्ण गेल्या चार दिवसांपर्यंत या डॉक्टरच्या संपर्कात होते. ते सारे रुग्ण आता धास्तावले आहेत. दिवसभर गजबजलेल्या या भागात आता शुकशुकाट असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पाहायला मिळाले आहे.

डॉक्टरला कोरोना; अमरावतीच्या वडाळी परिसरात भितीचे वातावरण

शुक्रवारी सिंधनगर भागात राहणाऱ्या एका डॉक्टरला कोरोना झाल्याचा अहवाल समोर आला होता. सदर डॉक्टर हा कोरोनाबाधित असून त्याचा प्रतिबंधित क्षेत्र घोषित असणाऱ्या ताज नगर परिसरात दवाखाना सुरू होता. यासोबतच ताज नगरपासून सुमारे 12 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वडाळी परिसरातही या डॉक्टरचा दवाखाना सुरू होता. सकळी ताज नगर आणि दुपारपासून रात्री 10 वाजेपर्यंत वडाळी परिसरात डॉक्टर रुग्ण तपासत होते. वडाळी परिसरात या डॉक्टरने त्याला कोरोना असल्याचे स्पष्ट होण्याच्या 2 दिवस पूर्वीपर्यंत अनेक रुग्णांची तपासणी केली आहे.

दरम्यान, डॉक्टरकडे या आठ- पंधरा दिवसात जे रुग्ण तपासणीसाठी आले त्या रुग्णांची माहिती असणारी कुठलीही नोंदवही या डॉक्टरकडे नाही अशी माहिती आहे. या आठ दिवसात डॉक्टरकडे अनेक रुग्ण गेले असून आता मात्र सगळेच धासातवले आहेत. डॉक्टरच्या सर्वाधिक संपर्कात असणाऱ्या महिलेला शुक्रवारी संस्थांत्मक विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. ही महिला दवाखान्यात कंपाऊंडर म्हणून काम करत होती. त्या महिलेचा स्वॅब नेमका काय येतो याची वाडाळीतील सर्व रहिवाशांना उत्सुकता लागली आहे. वडाळी भगत ज्या ठिकाणी त्या डॉक्टरचा दवाखाना आहे, त्या भागासह वडाळी परिसरातील विविध परिसरात शनिवारी सायंकाळी जंतूनाशक फवारणी अमरावती महापालिकेने केली. वडाळी प्रभागाचे नगरसेवक आशिष गावंडे यांनी सदर डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतः समोर यावे आणि कोरोना चाचणी करून घ्यावी, अशी विनंती केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.