ETV Bharat / city

Umesh Kolhe Murder Case CCTV : उमेश कोल्हे हत्या प्रकरण; हत्येच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांंकडे, तपास सुरु - नुपूर शर्मा अमरावती मराठी बातमी

अमरावतीतील 55 वर्षांच्या मेडिकल चालकाची हत्या करण्यात आली. उमेश कोल्हे असे या मेडिकल चालकाचे नाव आहे. नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने ही हत्या केल्याचा आरोप भाजपने केला. त्यानंतर याप्रकरणाबाबात पोलीस उपायुक्तांनी मोठी प्रतिक्रिया व्यक्त केली. कोल्हे यांची हत्या ( Umesh Kolhe Murder Case ) नुपूर शर्मांबाबात समाज माध्ममावर केलेल्या पोस्टमुळेच करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी स्पष्ट केले आहे.

Kolhe Murder Case CCTV
उमेश कोल्हे यांच्या हत्येच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज
author img

By

Published : Jul 2, 2022, 8:33 PM IST

Updated : Jul 2, 2022, 9:06 PM IST

अमरावती - औषधी व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्येच्यावेळी श्याम चौक लगतच्या घंटी घड्याळ परिसरात झालेल्या घडामोडींचा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासला. या फुटेजमध्ये एका दुचाकीवर दोन संशयीत दिसत असून दुसऱ्या एका कॅमेरात दुचाकीस्वार दोघेजण भरधाव वेगात येत असताना अचानक थांबून ते माघारी देखील वेगात परत असताना दिसत आहेत. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावरून उमेश कोल्हे हत्या प्रकरणात आणखी काही वेगळी माहिती मिळेल का याची चौकशी पोलीस करीत आहेत. ( Kolhe Murder Case CCTV Footage )

उमेश कोल्हे यांच्या हत्येच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज

नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्या हत्या झाल्याचा पोलिसांचा दावा - अमरावतीतील 55 वर्षांच्या मेडिकल चालकाची हत्या करण्यात आली. उमेश कोल्हे असे या मेडिकल चालकाचे नाव आहे. नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने ही हत्या केल्याचा आरोप भाजपने केला. त्यानंतर याप्रकरणाबाबात पोलीस उपायुक्तांनी मोठी प्रतिक्रिया व्यक्त केली. कोल्हे यांची हत्या ( Umesh Kolhe Murder Case ) नुपूर शर्मांबाबात समाज माध्ममावर केलेल्या पोस्टमुळेच करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी स्पष्ट केले आहे. हत्या प्रकरण 21 जूनच्या रात्रीचे आहे. हत्या झाली तेव्हा त्यांच्या जवळील मुद्देमाल तसाच होता त्यामुळे या हत्ये पाठीमागे लुटपाट करण्याचा हेतु नव्हता हे स्पष्ट झाले होते. त्यामुळे हत्येच्या कारणांवरचा सस्पेन्स कायम होता. अखेर ही हत्या नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ केलेल्या पोस्टमुळे झाल्याचे पोलिसांनी जाहिर केले.

  • Final moments captured in CCTV footage from the night of 21st June show Amravati-based shop owner Umesh Kolhe (pic 1) who was stabbed to death on his scooter and three accused (pic 2) on a bike near a school building in Amravati

    CCTV visuals verified by police pic.twitter.com/fgTfZXJ6Ye

    — ANI (@ANI) July 2, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - Umesh Kolhe Murder Case: कोल्हेंनी गाडी थांबवली अन् त्याने क्षणार्धात गळा चिरला; वाचा त्या रात्रीची थरारक कहाणी

काय आहे प्रकरण? - शहरातील उमेश कोल्हे ( रा. घनश्यामनगर ) या मेडिकल व्यावसायिकाची चाकून गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. 21 जून रोजी ही धक्कादायक घटना घडली होती. कोल्हे यांचे तहसील कार्यालय परिसरात मेडिकल स्टोअर्स आहे. मंगळवारी रात्री त्यांनी मेडिकल स्टोअर्स बंद केले. त्यानंतर ते मुलगा संकेत (२७) व सून वैष्णवी यांच्यासोबत घरी जायला निघाले. समोर एका दुचाकीवर उमेश तर मागे दुसऱ्या दुचाकीवर मुलगा संकेत व त्यांची पत्नी वैष्णवी जात होते. न्यू हायस्कूल मेन समोरील गल्लीतून जात असताना एका दुचाकीजवळ तीन जण उभे होते. त्यातील एकाच्या हातात चाकू होता. ते तिघेही अचानक उमेश यांच्या दुचाकीच्या आडवे झाले.

हेही वाचा - Amravati Chemist Murder : उमेश कोल्हेंची हत्या नुपूर शर्मांबाबत केलेल्या पोस्टमुळेच; पोलीस उपायुक्तांनी केलं स्पष्ट

मुलांसमोरच चिरला गळा - उमेश यांची गाडी जवळ येताच त्या तिघांनी त्यांना अडवे आले त्यामुळे उमेश यांनी त्यांची दुचाकी थांबवली. त्याचवेळी कोणाला काही कळायच्या आत ज्याच्या हातात चाकू होता त्याने अगदी सऱ्हाईतपणे त्यांच्या गळ्यावर चाकु चालवला. क्षणार्धात उमेश यांना मोठा रक्तश्राव सुरु झाला आणि ते त्याच अवस्थेत रस्त्यावर कोसळले. पाठीमागुन येत असलेल्या संकेत आणि वैष्णवी यांच्या समोरच उमेश यांचा गळा चिरला गेला आणि ते पडले वार इतका मोठा होता की उमेश यांना जागेवरुन हालताही आले नाही. कोणाला काही कळायच्या आत हा प्रकार घडला होता.

आरडा ओरड करताच पळाले मारेकरी - काही क्षणात घडलेल्या या प्रकारात नेमके काय घडले हे कळायच्या आत संकेतने वडील रक्ताच्या थारोळ्यात बेशुध्द पडल्याचे पाहिले. आणि तो घाबरुन गेला. तेवढ्यात त्याने प्रसंगावधान दाखवत वडलांकडे धाव घेतली आणि मदतीसाठी आरडा ओरड करायला सुरवात केली. दरम्यान मारेकऱ्यांनी हा ओरडण्याचा आवाज एैकताच दुचाकीवरुन घटनास्थळावरुन लगेच पळ काढला. संकेतच्या ओरडण्यामुळे रस्त्यावरुन जाणारे काही लोक काय झाले हे पहायला तीकडे येउ लागले होते. पण दरम्यान मारेकऱ्यांनी पळ काढलेला होता.

डॉक्टर युनूस खान बहादूर खानला चार दिवसांची पोलीस कोठडी - अमरावती शहरातील औषधी विक्रेता उमेश कोल्हे हत्या प्रकरणात ( Drug Dealer Umesh Kolhe Murder Case ) पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केलेला डॉ. युसुफ खान याला जिल्हा व सत्र न्यायालयाने 6 जुलै पर्यंत पोलीस कोठडी ( Yusuf Khan To Police Custody ) सुनावली आहे. या प्रकरणात अन्य एक आरोपी अतीब रशीद आदिल रशीद याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी एकूण सहा जणांना अटक केली आहे.

सहा जणांना अटक - या प्रकरणी पोलिसांनी अतिफ राशीद आदिल रशीद ( वय, २४ रा. मौलाना आझाद कॉलनी), मुदस्सीर अहेमद शेख इब्राहिम ( वय २२, रा. बिसमिल्लानगर ), शाहरूख पठाण हिदायत खान ( वय२४, रा. सुफियाननगर), अब्दुल तौफिक उर्फ नानू शेख तसलिम ( वय, २४ रा. बिसमिल्लानगर ) आणि शोएब खान उर्फ भुऱ्या वल्द साबीर खान (वय २२, रा. यास्मीननगर ), अशा पाच जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा - Amravati Chemist Murder : उमेश कोल्हे प्रकरणाची गृहमंत्रालयाकडून दखल; तपास एनआयएकडे वर्ग

Last Updated : Jul 2, 2022, 9:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.