ETV Bharat / city

उद्याच्या मन की बात मधून अमरावती मनपा साधणार मोदींसोबत संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Amravati municipal corporation in Mann ki Baat) यांच्याशी 'मन की बात' या कार्यक्रमाच्या माध्यमातून उद्या रविवारी सकाळी ११ वाजता संवाद साधण्याची संधी अमरावती मनपाला मिळणार आहे (PM modi communicate to Amravati). यासंदर्भात मनपाने पीएम कार्यालयाशी पत्रव्यवहार केला आहे. तसेच खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी विशेष प्रयत्न केल्याची माहिती मनपा आयुक्त डॉ. आष्टीकर यांनी दिली.

अमरावती मनपा साधणार मोदींसोबत संवाद
अमरावती मनपा साधणार मोदींसोबत संवाद
author img

By

Published : Sep 24, 2022, 6:18 PM IST

अमरावती - मन की बात या कार्यक्रमामध्ये महानगरपालिकेमधील सर्व स्वच्छता कर्मचारी तसेच फेरीवाले आमंत्रित आहेत. फेरीवाले तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मानसुद्धा या मन की बातच्या कार्यक्रमानंतर केला जाईल. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधण्याची संधी अमरावती मनपाला मिळणार आहे (PM modi communicate to Amravati).

खा. डॉ. बोंडे यांचा पुढाकार - भारतीय जनता पक्षातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आठ वर्षातील कार्यकाळाची प्रदर्शनीसुद्धा लावण्यात येईल (Amravati municipal corporation in Mann ki Baat). पंतप्रधान मोदी यांच्या 'मन की बात' कार्यक्रमाचे दूरदर्शनवर प्रसारण होणार आहे. या कार्यक्रमांमध्ये खासदार, आमदार, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित राहतील. या कार्यक्रमामध्ये फेरीवाले व सफाई कामगार यांना विशेष उपस्थित राहण्याची संधी मिळाली आहे.

अमरावती मनपा साधणार मोदींसोबत संवाद
अमरावती मनपा साधणार मोदींसोबत संवाद

कार्यक्रमाला उपस्थित राहावे - महानगरपालिकेत नियमित साडेसहाशे सफाई कर्मचारी आहेत. ३४३२ हॉकर्स ओळख पत्राकरिता पात्र ठरविण्यात आले होते. त्यापैकी १ हजार ९३३ ओळखपत्र वितरित करण्यात आली. यावेळी प्राथमिक स्वरूपात ओळखपत्राचे वाटप करण्यात येईल. पीएम स्वनिधीमध्ये महापालिकेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मनपातर्फे राबविण्यात आलेल्या अनेक योजनांची माहितीसुद्धा दिली जाईल. अधिकाधिक नागरिक व अधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन मनपा आयुक्त डॉ. आष्टीकर यांनी केले. पत्रपरिषदेला उपायुक्त भाग्यश्री बोरेकर, उपायुक्त डॉ सीमा नैताम, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसदकर उपस्थित होते.

अमरावती सांस्कृतिक भवनात आयोजन - उद्या सकाळी 11 वाजता सुरू होणाऱ्या 'मन की बात' या कार्यक्रमातून महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. शहरातील सुसज्य सांस्कृतिक भवनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाच्या नियोजनाची तयारी प्रशासनाने केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.