ETV Bharat / city

OBC Reservation : महापालिकेच्या 98 जागापैकी 26 जागा ओबीसीसाठी आरक्षित

अमरावती महानगरपालिका (Amravati Municipal Corporation) सार्वत्रिक निवडणूकीव्दारे, गठित होणाऱ्या महानगरपालिका सदस्य पदांचे ओबीसी आरक्षण (OBC Reservation) निश्चित करण्यासाठी सोडत कार्यक्रम राबविण्यात आला. यात ९८ जागांपैकी (Out of 98 municipal seats) २६ जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित (26 seats are reserved) करण्यात आल्या. त्यामध्ये अनुसूचित जाती १७ पैकी महिला ९, अनुसूचित जमाती २ पैकी महिला १, नागरिकांचा मागास प्रवर्ग (ना.मा.प्र.) २६ पैकी महिला १३, सर्वसाधारण ५३ पैकी महिला २७ अशा जागांची सोडत निघाली.

OBC Reservation
ओबीसी आरक्षण
author img

By

Published : Jul 30, 2022, 4:20 PM IST

अमरावती: अमरावती महानगरपालिका (Amravati Municipal Corporation) सार्वत्रिक निवडणूकीव्दारे, गठित होणाऱ्या महानगरपालिका सदस्य पदांचे ओबीसी आरक्षण (OBC Reservation) निश्चित करण्यासाठी सोडत कार्यक्रम राबविण्यात आला. यात ९८ जागांपैकी (Out of 98 municipal seats) २६ जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित (26 seats are reserved) करण्यात आल्या.

निवडणूक विभागाद्वारे ही आरक्षण सोडत, सांस्‍कृतिक भवन येथे काढण्यात आली. यावेळी महानगरपालिका आयुक्‍त डॉ. प्रवीण आष्‍टीकर, अतिरिक्‍त आयुक्‍त हर्षल गायकवाड, उपायुक्‍त सुरेश पाटील, नगरसचिव मदन तांबेकर, सहाय्यक निवडणूक अधिकारी अक्षय निलंगे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. ही सोडत प्रक्रिया अत्यंत पारदर्शक वातावरणात पार पडली. प्रारंभी प्रभागाची नावे नमूद असलेली प्रत्येक चिठ्ठी, उपस्थितांना दर्शवून नंतर पारदर्शी डब्यात सर्वांसमोर टाकण्यात आल्या. त्याची सरमिसळ करुन शबनम कौर, मंजिल सिंग टांक, युक्‍ता राजेश उसरेटे, अंश योगेश प्रधान, नैतिक सुनिल धानोरकर या मनपा शाळा क्र.१४ वडाळी येथील शाळेच्या विद्यार्थ्‍यांच्‍या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या. महानगरपालिकेच्या सदस्य पदासाठी अनुसूचित जाती व जमातीच्‍या जागा सोडून उर्वरीत जागांसाठी सोडत काढण्‍यात आली. ९८ जागांपैकी महिलांना ५० जागा प्राप्त झाल्या आहेत. त्यामध्ये अनुसूचित जाती १७ पैकी महिला ९, अनुसूचित जमाती २ पैकी महिला १, नागरिकांचा मागास प्रवर्ग (ना.मा.प्र.) २६ पैकी महिला १३, सर्वसाधारण ५३ पैकी महिला २७ अशा जागांची सोडत निघाली.

दिग्गजांना फटका : माजी स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर यांना बेनोडा प्रभागात निवडणूक लढवण्यासाठी जागाच नाही. यावेळी त्यांना प्रभाग बदलण्याशिवाय पर्याय नाही. तर अंबा गेट प्रभागातील प्रणित सोनी, अजय सारसकर हे भाजपचे दोन्ही मावळते सर्वसाधारण जागेवर दावा करू शकतात. त्यामुळे पक्ष नेमकी कोणाला उमेदवारी देतो, हे बघणे औसुक्याचे ठरेल.

हेही वाचा : Maratha Reservation : मराठा समाजाला मोठा धक्का, EWS आरक्षण उच्च न्यायालयाकडून रद्द

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.