ETV Bharat / city

Amravati News : अमरावतीत लिंबाच्या झाडाखाली भरते शाळा, मुलांच्या हाती आले कटोऱ्याच्या जागी पुस्तक - school for backward class

अमरावतीतील राजुरा परिसरात शाळाबाह्य मुलांसाठी लिंबाच्या झाडाखाली एक शाळा ( Amravati School For Backward Class Children ) भरते. या शाळेत संस्कार आणि नीतिमूल्याचे धडे विद्यार्थी घेत आहेत. यासाठी शाळेसाठी निकिता पवार या युवतीने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद ( Amravati Nikita Pawar School ) आहे.

amravati nikita pawar school
amravati nikita pawar school
author img

By

Published : Feb 21, 2022, 7:52 PM IST

Updated : Feb 21, 2022, 9:37 PM IST

अमरावती - अमरावती शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर राजुरा गावाच्या परिसरात उघड्यावरच लिंबाच्या झाडाखाली शाळा भरते. ही शाळा सर्वसामान्य शाळेसारखी नाही तर या शाळेत येणाऱ्या लहान मुलांच्या आईवडिलांनी तसेच, त्यापूर्वीच्या पिढीने कधी शाळाच पाहिली नाही. अशा समाजातील शाळाबाह्य विद्यार्थी या शाळेत संस्कार आणि नीतिमूल्याचे धडे घेत ( Amravati School For Backward Class Children ) आहेत. आपल्या समाजावर अशिक्षितपणाचा लागलेला बट्टा पुसण्यासाठी याच समाजातील सुशिक्षित झालेली निकिता पवार ( Amravati Nikita Pawar School ) या युवतीने आपली पिढी सुजाण सुशिक्षित बनविण्यासाठी केलेला हा प्रयत्न कौतुकास्पद असाच आहे.

अशी भरते ही शाळा

राजुरा गावालगत जंगल परिसरात दररोज तीस ते पस्तीस चिमुकल्यांची शाळा भरते. निकिता पवार ही युवती वडाळी आणि राजुरा परिसरातील फासेपारधी समुदायातील शाळाबाह्य चिमुकल्यांना ऑटोरिक्षातुन या शाळेत आणते. उघड्यावर असणाऱ्या या शाळेत तीस ते पस्तीस चिमुकले येतात.

याबाबत 'ई टीव्ही भारत'शी बोलताना निकिता पवार म्हणाल्या, आपली मुलंही शिकली पाहिजे यासाठी आमच्या समाजातील लोकांमध्ये फिरून बरेच दिवस जनजागृती करावी लागली. मी पदव्युत्तर पदवी घेतल्यावर शिक्षकी अभ्यासक्रमाची पदवी घेतली आहे. अमरावती शहरातील नामांकित शाळेत मी शिक्षिका म्हणून काम केले. त्यानंतर सामाजिक न्याय विभागातही मी नोकरी केली. मात्र, आपल्या समाजातील मुलं शिक्षणाच्या प्रवाहात यायला हवीत यासाठी मी त्यांना स्वतःच्या संस्थेमार्फत शिक्षणासाठी मार्गदर्शन करीत आहे. माझ्या प्रयत्नांवर समाजातील लोकांचा विश्वास हळूहळू का होईना बसायला लागला आणि यामुळेच पालकांनी त्यांची मुले माझ्याकडे शिक्षणासाठी पाठवली.

अनेकांच्या मदतीतून मिळते ऊर्जा

वडाळी आणि राजुरा परिसरातील मुलांना गत सहा महिन्यांपासून शिकवण्याचे काम सुरू आहे. यापूर्वी चांदुर रेल्वे तालुक्यातील वाघोली या गावातील 30 ते 40 चिमुकल्यांना प्राथमिक शिक्षणाचे धडे दिले. त्यानंतर त्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल करून शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे. आतासुद्धा आमच्या समाजातील शेकडो चिमुकल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात मला आणायचे आहे. यासाठी समाजातील प्रत्येक घटकांकडून मदत हवी असल्याचेही निकिता पवार यांनी म्हटलं आहे.

प्रतिनिधीने घेतलेला शाळेचा आढवा

सामाजिक न्याय भवनातील नोकरी सोडून आपल्या समाजातील चिमुकल्यांना शिकवण्याचे काम सुरू केले. मात्र, काम सोपे नव्हते. माझ्या कुटुंबीयांनी मला धीर दिला. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी आर्थिक मदत केली. तसेच शिवसेनेचे नगरसेवक भारत चौधरी यांच्याकडून सुद्धा मदत मिळाली. माझ्या कामाला समाजातील विविध घटकांकडून मदत मिळाल्याने या कामासाठी माझी ऊर्जा वाढते. ऊन आणि पावसापासून संरक्षण करण्यासाठी आमच्या शाळेवर छत असावे तोडक्या-मोडक्या का होईना मात्र चार भिंती असाव्यात. ही माझ्यासह चिमुकल्यांचीही इच्छा असून, समाजाकडून आम्हाला नक्कीच आणखी मदत मिळेल, अशी अपेक्षाही पवार हिने व्यक्त केली.

शाळेत जेवणाचीही व्यवस्था

पुढे बोलताना निकीता पवारने सांगितले, या शाळेत चिमुकल्यांना रोज जेवणही मिळते. या मुलांना मी जेवण दिले नाही तर हे मुलं शाळेतच येणार नाही. आमच्या शाळेतील पंधरा, वीस मुलांना तर घरी दररोज केवळ एकाच वेळचे जेवण कसे बसे मिळते. जेवण हीच प्राथमिक गरज आमच्या समाजातील मुलांची पूर्ण होत नाही. त्यामुळे शिक्षण घेणे ही कठीण बाब आहे. मला माझा समाजाच्या व्यथा ठाऊक आहे त्यांचा इतरांवर विश्वास नाही. मात्र, मी त्यांच्यातील असल्यामुळे आज ही मुलं प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवायला लागले आहे.

चिमुकल्यांमध्येही उत्साह

'गुड मॉर्निंग मिस ', ' थँक्यू सर ', 'प्लीज वेलकम', असे इंग्रजी शब्द बोलीभाषेत वापरून आपणही आता शिकायला लागलो आहे. आपल्याला इतरांसारखी मराठी भाषा सुद्धा बोलता येत, थोडे फार इंग्रजी शब्दही कळायला लागले आहे. यामुळे या शाळेतील चिमुकल्यांमध्येही उत्साह पाहायला मिळतो आहे. इतरांप्रमाणे आपली शाळा ही चांगली व्हावी अशीच अपेक्षा या शाळेतील चिमुकल्यांनी सुद्धा व्यक्त केली. आता बेचे पाढे आम्हाला येतात. इंग्रजीत म्हणून दाखवू का की मराठीतच म्हणू असे विचारून या शाळेतील चिमुकले 2 च्या पाड्यापासून वीस पर्यंतचे पाढे तोंड पाठ म्हणून दाखवत आहेत. चिमुकल्यांची गाणी तसेच नाचण्याचा आनंदही या आगळ्यावेगळ्या शाळेत पाहायला मिळतो

हेही वाचा - Mumbai Film City Redevelopment : मुंबई चित्रनगरीच्या विकासाकरिता रामोजी फिल्म सिटीला निमंत्रण

Last Updated : Feb 21, 2022, 9:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.