ETV Bharat / city

अमरावतीत कोरोनाचा 28 वा रुग्ण; उपमहापौरांच्या घराजवळ रुग्ण आढळल्याने खळबळ

author img

By

Published : Apr 29, 2020, 8:06 PM IST

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. तर दुसरीकडे कोरोनाबाधित मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अमरावती शहरात देखील आज कोरोनाचा 28 वा रुग्ण आढळून आला आहे.

Amravati City corona updates
अमरावती शहर कोरोना अपडेट

अमरावती - शहरात आज (बुधवार) कोरोनाचा 28 वा रुग्ण आढळून आला आहे. शहराच्या उपमहापौर कुसुम साहू यांच्या घराच्या परिसरातच कोरोनाचा रुग्ण आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

अमरावती शहरात आढळला कोरोनाचा 28 वा रुग्ण...

हेही वाचा... भाजप नगरसेवकाच्या घरात रंगला पत्त्यांचा डाव; १२ जण ताब्यात

अमरावती शहरातील मासानगंज परिसरात चेतनदास बगीचा येथील एका 74 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हा परिसर अमरावती शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधित केलेल्या क्षेत्राबाहेरील असल्याने नागरिकांच्या चिंतेत अधिक भर पडली आहे.

प्राप्त अहवालानुसार सदर रुग्ण मागील चार दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत होता. आज त्याच्या कुटुंबातील सदस्यांचा स्व‌ॅब नमुने (घशातील स्त्रावाचे नमुने) कोरोना चाचणीसाठी घेण्यात आला आहे. एकूणच अमरावती शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 28 वर पोचल्याने शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.