अमरावती : जगभरातीलल जैन धर्मियांची काशी म्हणून ओळखले जाणारे सातपुडा पर्वतरांगेतील मुक्तागिरी हे सिद्धक्षेत्र आता निसर्ग सौंदर्याने बहरले आहे. कोरोना काळात तब्बल दीड वर्ष बंद असणारा हा परिसर मध्य प्रदेश सरकारने खुला केल्याने आता या भागात भाविकांची गर्दीही वाढली आहे.
सिद्धक्षेत्र मुक्तागिरी बहरले; दीड वर्षानंतर भाविकांची गर्दी सातपुडा पर्वतावर वसले आहेत 52 जैन मंदिरअमरावतीपासून अवघ्या 65 किमी अंतरावर सातपुडा पर्वतावर 52 जैन मंदिर आहेत. मुक्तागिरी अशी ओळख असणाऱ्या या परिसरात प्राचीन काळापासून जैन मंदिर बांधले गेले असून काही मंदिरांची निर्मिती 16 व्या शतकात झाली आहे. या मंदिरात जैन तीर्थकारांच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी एकूण 250 पायऱ्या चढाव्या लागतात. 52 मंदिरांपैकी दहाव्या क्रमांकाचे मंदिर हे अतिप्राचीन असून ते अडीच हजार वर्षे जुने असावे असे सांगण्यात येते. हे मंदिर गुहेत असून या मंदिरात भगवान पंचपरमेष्ठी या तीर्थंकरांची ध्यानमग्न मूर्ती आहे. या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचे महत्वाचे मंदिर म्हणून 26 व्या क्रमांकाचे आहे. या मंदिरात मूलनायक भगवान पार्श्वनाथ यांची पद्मासनातील काळ्या पाषाणात घडविलेली चार फूट उंच मूर्ती आहे. ही मूर्ती अचलपूर येथील राजा श्रीपाल याला स्वप्नात दिसली होती. त्याने स्वप्नात दिसलेली ही मूर्ती अचलपूर येथील एका सरोवरातून बाहेर काढली. तेव्हापासून ही मूर्ती मुक्तागिरी येथील 26 या क्रमांकाच्या मंदिरात स्थापन आहे असे सांगण्यात येते. या मंदिरात रोज सकाळी 8.30 वाजता शाश्वत पूजा आणि पंचामृतांचा अभिषेख केला जातो.
असा आहे इतिहासअतिशय प्राचीन असणाऱ्या मुक्तागिरी येथील संपूर्ण मंदिरांची नेमकी निर्मिती कोणी केली याची माहिती उपलब्ध नाही. मात्र इंग्रज शासन काळात या मंदिरांची व मंदिर परिसराची मालकी ही खापर्डे नामक व्यक्तीकडे होती. या परिसरात त्याकाळी शिकाऱ्यांनी थैमान घातल्याने जैन अचलपूर येथील जैन धर्माचे अनुयायी श्रीमंत नात्थुसा पासूला कळमकर यांनी संपूर्ण मुक्तगिरी पहाड आणि मंदिर 1928 मध्ये खापर्डे यांच्याकडून विकत घेतले. आज मुक्तागिरीची संपूर्ण जबाबदारी 'श्री दिगंबर जैन सिद्धक्षेत्र मुक्तागिरी' या संस्थेच्या वतीने सांभाळली जात आहे.
धबधबा घालतो सौंदर्यात भरसातपुडा पर्वतात वसलेल्या मुक्तागिरी येथे पावसाळ्यात भाविक तसेच पर्यटकांची सर्वाधिक गर्दी होते. पावसाळ्यात हिरवळीने बहरलेल्या मुक्तगिरी येथे पहाडावरून कोसळणारा धबधबा या परिसराच्या सौंदर्यात भर घालतो.
मुक्तागिरी मध्य प्रदेशात, मार्ग मात्र महाराष्ट्रातमुक्तागिरी हे ठिकाण मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील भैसदेही तालुक्यक्त आहे. मध्य प्रदेशात असणाऱ्या मुक्तागिरीला जाण्यासाठीचा मार्ग महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथून जातो. परतवाडापासून मुक्तागिरी साडेसतरा किमी अंतरावर आहे.
हेही वाचा - पिकनिकला जाताय, सावधान!!! राज्यात सापडले अतिघातक कोरोना डेल्टा प्लसचे २१ रुग्ण