अमरावती - बडनेराचे आमदार रवी राणा यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांना येथील रेडीएन्ट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आमदार रवी राणा यांच्यासह यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांचाही स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला.
रवी राणा यांना शुक्रवारी ताप आला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची तपासणी केली. शुक्रवारी दिवसभर राणा यांचा ताप 102,104 सेल्सिअसपेक्षा कमी होत नसल्यामुळे त्यांना आज रेडीएन्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले. आमदार राणा यांच्या छत्तीचा एक्स-रे काढण्यात आला असून त्यांच्यासह खासदार नवनीत राणा यांचाही स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला आहे.
कोरोना धसका; आमदार रवी राणा रुग्णालयात दाखल; खासदार नवनीत राणा यांचीही होणार स्वॅब तपासणी - Corona Update
आमदार रवी राणा यांचा ताप 102,104 सेल्सिअसपेक्षा कमी होत नसल्यामुळे त्यांना आज रेडीएन्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले.