ETV Bharat / city

..अन यशोमती ठाकूर यांनी लाटल्या पोळ्या; जेवणाचे पार्सलही भरले - Yashomati Thakur visit Haramkar house

जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शुक्रवारी रात्री खोलपुरी गेट पोलीस ठाण्यालागत हरमकर यांच्या घरी भेट देऊन जेवण बनविणाऱ्या महिलांसोबत बसून पोळ्या लाटल्या. ठाकूर यांनी जेवणाचे पार्सल भरण्यासही मदत करून हरमकर व त्यांच्या मित्रमंडळींच्या कामाला सलाम केला.

Yashomati Thakur prepare chapati
हरमकर घर भेट यशोमती ठाकूर
author img

By

Published : Jun 5, 2021, 3:47 PM IST

अमरावती - कोविड काळात कोविड रुग्णालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल रुग्णांच्या नातेवाईकांना जेवण मिळावे यासाठी शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख प्रवीण हरमकर यांच्यावतीने त्यांच्या घरासमोर दीड महिन्यांपासून स्वयंपाक होत आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शुक्रवारी रात्री खोलपुरी गेट पोलीस ठाण्यालागत हरमकर यांच्या घरी भेट देऊन जेवण बनविणाऱ्या महिलांसोबत बसून पोळ्या लाटल्या. ठाकूर यांनी जेवणाचे पार्सल भरण्यासही मदत करून हरमकर व त्यांच्या मित्रमंडळींच्या कामाला सलाम केला.

Yashomati Thakur prepare chapati
मंत्री यशोमती ठाकूर

हेही वाचा - यशोमती ठाकूर यांनी घेतली 'त्या' बालकाची भेट, कठोर कारवाईचे दिले आदेश

कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला

यशोमती ठाकुर यांनी हरमकर यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी महिलांसोबत बसून पोळ्या केल्या, भाजीपोळीचे पार्सल भरण्यास मदत केली. यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला. पालकमंत्र्यांनी सर्व टीमचे तोंड भरून कौतुकही केले. शिवसेना सहसंपर्कप्रमुख प्रवीण हरमकर, शिवसेना व सक्करसात मित्रमंडळी सतत 45 दिवसांपासून कोविड रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना जेवणाची व पाण्याची सोय करून देत आहेत. पालकमंत्र्यांनी त्यांच्या कामाची दखल घेतल्याने त्यांचा उत्साह आता आणखी वाढला आहे.

Yashomati Thakur prepare chapati
मंत्री यशोमती ठाकूर

..या ठिकाणी पुरविले जाते जेवण

एक ते दीड वर्षापासून सुरू असलेल्या कोरोना महामारीने ग्रासलेल्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना प्रवीण हरमकर जेवण पुरवित आहेत. पहिली लाट ओसरल्यावर हे कार्य थांबले होते. मात्र, दुसरी लाट येताच पुन्हा एकदा या कार्याला सुरुवात झाली. कोविड रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, सुपर स्पेशालिस्ट व पंजाबराव देशमुख रुग्णालयात जेवण आणि पाणी वाटप केले जाते. या समाज कार्याला सर्व मित्रमंडळींचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो.

..यांचा आहे सहभाग

या समाजकार्याला ओम भाऊ सोमानी, अनुप पुरवार, गोविदसिंग ठाकूर, मनीश रामावत, संदिप मानेकर, बबन डोडके, प्रमोद वानखडे आदी सहकार्य करीत आहेत.

हेही वाचा - विनापरवानगी साखरपुडा; अमरावतीच्या कांचन रिसॉर्टवर गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.