अमरावती : संपूर्ण जिल्ह्यात लंपीच्या आजाराने थैमान घातले ( Lumpy disease in melghat ) आहे. जिल्ह्यात मेळघाट मधल्या गुरांना याचा अधिक फटका बसला आहे. अशातच या आजारावर उपचार ऐवजी नारळ लिंबूचा उतारा अधिक प्रभावी असल्याचे आदिवासींना वाटते आहे. एवढेच नव्हे, तर काहींनी नवस कबूल केल्याचे चित्रसुद्धा मेळघाटातील आदिवासी दुर्गम भागात पाहायला मिळते ( in melghat people vowed god to cure Lumpy disease ) आहे.
'लम्पी' या आजारासाठी मेळघाटातील मुठादेवाला साकडे गुरांवर आलेल्या 'लम्पी' या आजारासाठी मेळघाटातील आदिवासी बांधव थेट गावदेव असलेल्या मुठादेवाला साकडे घालत आहे. काहींनी नवस कबूल केल्याचे चित्र गुरुवारी तालुक्यातील चिखली या गावात पाहायला (people vowed to god to cure Lumpy disease ) मिळाले. त्यामुळे आदिवासींची प्रत्येक सुखदुःखात असलेली अंधश्रद्धा पुन्हा एकदा पुढे आली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित क्षेत्रातील आदिवासी पाड्यांमध्ये गुरांवर मोठ्या प्रमाणात लम्पी आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे.
गावदेवाजवळ नारळ, लिंबू आणि नवस कबुल ( people vowed god ) त्यामुळे पशुपालक असलेले गोरगरीब, आदिवासी शेतकरी हवालदिल झाले आहेत. दुसरीकडे हा आजार रानगवा या गायवर्गीय प्राण्यांसह इतरही प्राण्यांवर पसरू नये, यासाठी व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंवेदनशील क्षेत्रातील गावांमध्ये जनजागृती व लसीकरणाची माहिती दिली जात आहे. तथापि, पशुवैद्यकीय विभाग पाहिजे त्या प्रमाणात लस उपलब्ध नसल्यामुळे थिटा पडला आहे.
कोरोना सारखी परिस्थिती ; गावाची सीमा केली सील 'लम्पी' आजाराची लागण झालेल्या आदिवासी पाड्यातील पाच किमी लम्पी आजारावर उपचाराऐवजी अंतरावरच असलेल्या उपाययोजना व तातडीने लसीकरण करण्याची गरज आहे. परंतु मेळघाटातील आदिवासी पाडे जंगल सीमारेषेवर असल्याने पशु विभाग व व्याघ्र प्रकल्पाला प्रशिक्षित करून वाचवण्याची गरज आहे.