ETV Bharat / city

Jyeshtha Gauri Puja 2022 काय आहे गौरीपूजनाची विदर्भातील प्रथा जाणुन घेऊया - जेष्ठा गौरी पुजा 2022

आज दिनांक 3 सप्टेंबर 2022 शनिवार रोजी जेष्ठा गौरी आवाहन Jyeshtha Gauri Puja 2022 आहे. ज्येष्ठा गौरी ही साक्षात पार्वतीचे स्वरूप असल्याची मान्यता आहे. त्यामुळे तिची विधीवत पुजा कशी करतात, काय नैवेद्य देतात, कशाचा मान आहे? याबाबतची माहीती आज आपण बघणार आहोत. what is the custom of Gauri Puja in Vidarbha

Jyeshtha Gauri Puja 2022
गौरीपूजनाची विदर्भातील प्रथा जाणुन घेऊया
author img

By

Published : Sep 3, 2022, 4:22 PM IST

अमरावती गणपती बाप्पाचे घरोघरी आगमन झाले असतांना, महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये शनिवारी जेष्ठा गौरीचे Jyeshtha Gauri Puja 2022 आगमन झाले. महाराष्ट्रात ज्येष्ठा गौरीची पूजा विविध प्रकारे केली जाते. विदर्भात ज्येष्ठा गौरीचे आगमन आणि पूजनाची आपली एक विशिष्ठ पद्धत the custom of Gauri Puja आहे. ज्येष्ठा गौरीला सोळा भाज्या आणि सोळा चटण्यांचा विशेष असा नैवेद्य अर्पण केला जातो. यासह आंबील व आंबील फळांना अतिशय महत्त्व आहे. what is the custom of Gauri Puja in Vidarbha

प्रतिक्रिया व्यक्त करतांना शरयू ठाकरे चव्हाण

ज्येष्ठा गौरी साक्षात पार्वतीचे स्वरूप विदर्भात in Vidarbha जेष्ठा गौरीला 'महालक्ष्मी' असे सुद्धा म्हणतात. ज्येष्ठा गौरी ही साक्षात पार्वतीचे स्वरूप असल्याची मान्यता आहे. ज्येष्ठा गौरीच्या या तीन दिवसात स्वतः पार्वती माता माहेर पणाला येतात, असे देखील सांगितले जाते. यामुळेच माहेरवाशीणीच्या आवडीचे गोडधोड पदार्थ ज्येष्ठा गौरीचे आगमन होताच; सलग तीन दिवस बनविले जातात. अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा गौरीचे आवाहन, ज्येष्ठ नक्षत्रावर तिचे पूजन आणि मूळ नक्षत्रावर तिचे विसर्जन असे हे तीन दिवसांचे व्रत आहे. यावर्षी 3 सप्टेंबर रोजी गौरी आवाहन, 4 सप्टेंबर रोजी गौरीपूजन आणि 5 सप्टेंबरला गौरी विसर्जन केले जाणार आहे. 3 सप्टेंबरला शनिवारी रात्री दहा वाजून 56 मिनिटांपर्यंत ज्येष्ठा गौरी आवाहन अर्थात ज्येष्ठा गौरीची स्थापना करण्याचा मुहूर्त आहे.

विदर्भात ज्वारीची आंबील आणि आंबील फळांना महत्त्व विदर्भात ज्येष्ठा गौरी पूजनाला आंबील फळाच्या नैवेद्याचे महत्त्व आहे. आंबील ही ज्वारीपासून तयार केली जाते. यासाठी ज्वारीला दोन तासांपर्यंत पाण्यात भिजवले जाते. यानंतर ज्वारीला काही वेळ सुकविले जाते, यानंतर चाळून आणि पाखडून या ज्वारीचे रवेदार पीठ केले जाते. यानंतर हे पीठ ताकामध्ये भिजवले जाते. यानंतर ताकात भिजवलेल्या पिठाला गरम पाण्यामध्ये शिजवून त्यामध्ये चण्याची डाळ, सुंठ पावडर, खोबऱ्याचे तुकडे ,विलायची पावडर घालून हे संपूर्ण मिश्रण पाणी घालून शिजवून आंबील तयार केली जाते . तर काही ठीकाणी ज्वारीचे पीठ गरम पाण्यात भिजवून या पिठाच्या पुरीच्या आकाराचे फळ तयार केले जातात. या फळांना गरम पाण्याच्या वाफेवर शिजवले जाते.

नैवेद्य मध्ये 16 भाज्या आणि चटण्यांना मान ज्येष्ठा गौरीला अर्पण केल्या जाणाऱ्या नैवेद्यामध्ये आंबिल फळां इतकाच सोळा भाज्या आणि चटण्यांना मान आहे. ताकात बेसन भिजवून तयार केल्या जाणाऱ्या कथलीचे सुद्धा महत्त्व आहे. लसूण अद्रक आणि हिरव्या मिरच्या टाकूनही कथली तयार केली जाते. यासोबतच एकूण सोळा प्रकारच्या विविध भाज्या नैवेद्यात असतात. यामध्ये काशीफळ अर्थात कवळ्याच्या भाजीला सर्वाधिक महत्त्व आहे. या भाज्यांसोबतच तीळ, चणाडाळ, जवस, शेंगदाणा, मूग, हिरवी मिरची कोथिंबीर, काकडी, गाजर, कराड अशा सोळा प्रकारच्या विविध चटण्या ही नैवेद्यात असतात.

नैवेद्यात असतात 16 पुरणपोळ्या ज्येष्ठा गौरीच्या नैवेद्यामध्ये पुरणाच्या 16 पोळ्यांना मान आहे. पुरणाचे मोदक देखील नैवेद्य मध्ये ठेवले जातात. यासोबतच आळुच्या वड्या, मुगाचे वडे, भजे यांना सुद्धा अतिशय मान आहे. लाडू, करंजी, अनारसे, पापड्या यांचा फुलोरा ज्येष्ठा गौरीला अर्पण केला जातो.

पूजनानंतर दार करतात बंद सायंकाळी ज्येष्ठा गौरीची आरती झाल्यावर, काही वेळेसाठी ज्येष्ठा गौरी ज्या ठिकाणी स्थापन करण्यात आली आहे; त्या ठिकाणचे दार दहा ते पंधरा मिनिटांसाठी बंद केले जातात. ज्येष्ठा गौरी त्यांच्यासमोर ठेवलेले नैवेद्य ग्रहण करतात, अशी मान्यता आहे. त्यामुळे यावेळी त्यांना पाहू नये, म्हणून काही वेळ दार बंद करण्याची प्रथा आहे.

दिवसभर ठेवला जातो उपवास ज्यांच्या घरी जेष्ठा गौरीची स्थापना केली जाते. त्या घरातील सदस्य ज्येष्ठा गौरीच्या पूजनाच्या दिवशी दिवसभर उपवास ठेवतात. सायंकाळी गौरी पूजन झाल्यावर आणि ज्येष्ठा गौरींना नैवेद्य अर्पण केल्यावर उपवास सोडला जातो. what is the custom of Gauri Puja in Vidarbha

हेही वाचा Sankashti Chaturthi 2022 : 13 सप्टेंबरला आहे संकष्टी चतुर्थी; जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि महत्व

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.