ETV Bharat / city

अमरावतीत गुड फ्रायडे निमित्त क्रूस परिक्रमा; ख्रिस्ती बांधवांनी केली सामूहिक प्रार्थना

येशू ख्रिस्त यांनी बलिदान दिले तो दिवस शुक्रवार ( 15 एप्रिल ) होता. त्यामुळे, या दिवसाला गुडफ्रायडे, असे म्हटले जाते. अमरावती शहरात इर्विन चौक ( Good Friday at church Irwin Square amravati ) येथील चर्चमध्ये गुड फ्रायडे निमित्त शेकडो ख्रिस्ती बांधवांनी एकत्रित येऊन प्रार्थना केली.

author img

By

Published : Apr 18, 2022, 8:50 AM IST

Christians gathered church Irwin Square amravati
गुड फ्रायडे चर्च इर्विन चौक अमरावती

अमरावती - येशू ख्रिस्त यांनी बलिदान दिले तो दिवस शुक्रवार ( 15 एप्रिल ) होता. त्यामुळे, या दिवसाला गुडफ्रायडे, असे म्हटले जाते. अमरावती शहरात इर्विन चौक ( Good Friday at church Irwin Square amravati ) येथील चर्चमध्ये गुड फ्रायडे निमित्त शेकडो ख्रिस्ती बांधवांनी एकत्रित येऊन प्रार्थना केली.

हेही वाचा - Uday Samant Replied To Navneet Rana : 'मातोश्री सोडा, आधी अमरावतीतील शाखा प्रमुखांच्या घरासमोर हनुमान चालिसा म्हणून दाखवा'

आत्मपरीक्षणाचा दिवस - भगवान येशू ख्रिस्त यांना शुक्रवारी क्रूसावर चढविण्यात आले होते. हा दिवस ख्रिस्ती बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी ख्रिस्ती बांधव हे आत्मपरीक्षण करतात. क्रूस स्वतःच्या खांद्यावर वाहून नेत चर्च परिसराची परिक्रमा केली जाते, अशी माहिती सिस्टर जोयला यांनी' ईटीवी भारत'शी बोलताना दिली.

गुड फ्रायडे निमित्त इर्विन चौक येथील चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांनी क्रूसचे पूजन करून क्रूस खांद्यावर घेऊन चर्च परिसरात असणाऱ्या एकूण 14 महत्त्वाच्या ठिकाणांची परिक्रमा केली. येशू ख्रिस्त यांना क्रूसवर चढविले, क्रूसवर त्यांना झालेल्या वेदना आणि त्यानंतर येशू ख्रिस्ताने मानवाच्या उद्धारासाठी दिलेला संदेश याबाबत प्रार्थना करण्यात आली. येशु ख्रिस्त यांनी मानवाच्या उद्धारसाठी बलिदान दिले. त्या क्षणी प्रचंड वेदना होत असतानाही प्रेम, दया, शांती याचा संदेश मानव समाजासाठी येशू ख्रिस्त यांनी दिला असल्यामुळे हा दिवस गुड फ्रायडे म्हणून साजरा करण्यात येतो, अशी माहिती सिस्टर जोयला यांनी दिली.

हेही वाचा - Praven Ashtikar Ink Thrown Case : अमरावती मनपा आयुक्त शाईफेक प्रकरणी रवी राणांनी नोंदवला जवाब

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.