ETV Bharat / city

यंदाही गणपतीची मूर्ती चार फुटांचीच; मूर्तिकारांना आर्थिक झळ

अमरावती शहरात एकूण 296 सार्वजनिक गणेशोत्व मंडळात श्रींची स्थापना केली जाते. यंदा मात्र, केवळ 54 गणेशोत्सव मंडळांनाच गणपती स्थापनेची परवानगी दिली जाणार आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात 1151 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असून त्यापैकी 289 सार्वजनिक मंडळांनाच गणपती स्थापन करण्याची परवानगी आहे.

amravati
मूर्तिकारांना आर्थिक झळ
author img

By

Published : Aug 23, 2021, 3:36 PM IST

अमरावती - पुन्हा कोरोनाचा धोका होऊ नये, यासाठी शासनाच्या वतीने यंदाही कोरोना नियम पळूनच गणेशोत्सव साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार गणरायाची मूर्ती चार फुटांपेक्षा मोठी नसेल. त्यामुळे मूर्तीकारांनी चार फुटांच्या मूर्तीलाच आकार दिला आहे. कोरोनामुळे गणेशोत्सवालाच जल्लोष हवा तसा नसल्याने गणपती बनविणाऱ्या मूर्तिकारांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे.

मूर्ती चार फुटांचीच

सार्वजनिक मंडळ कमी झाल्याचा फटका
अमरावती शहरात एकूण 296 सार्वजनिक गणेशोत्व मंडळात श्रींची स्थापना केली जाते. यंदा मात्र, केवळ 54 गणेशोत्सव मंडळांनाच गणपती स्थापनेची परवानगी दिली जाणार आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात 1151 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असून त्यापैकी 289 सार्वजनिक मंडळांनाच गणपती स्थापन करण्याची परवानगी आहे. याआधी एकाच परिसरात चार ते पाच मंडळात गणरायाची स्थापना केली जात होती. मात्र, आता कोरोनामुळे एकाच परिसरात एकाच मंडळाला परवानगी देण्यात आली आहे. मोठ्या संख्येतील सार्वजनिक मंडळात गणपतीची स्थापना होणार नसल्याने याचा परिणाम मूर्तिकारांच्या व्यवसायावर होत आहे.

amravati
गणेशमूर्तींवर शेवटचा हात लावताना
मूर्ती घडविणे झाले महागजुन्या शहरील कुंभारवाडा, राजापेठ, फ्रेजारपुरा, बडनेरा येथील कुंभारवाडा या भागात मूर्ती घडविण्याचे काम मोठ्या प्रमाणात होते. मूर्ती घडविण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांचे दर वाढले असल्याने त्याचा परिणाम मूर्तींच्यादरावर जाणवतो आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी मूर्तींचे दर वाढले आहे.
amravati
मूर्ती तयार करताना
मूर्तिकारांना कर्ज फेडणे कठीणपरंपरागत मूर्ती व्यवसायात असणारे अनेक मूर्तिकार बँकेचे कर्ज घेऊन मूर्ती बनविण्याचे काम करतात. कोरोनामुळे गेल्यावर्षीपासून शहर व जिल्ह्यातील गणपती मंडळ कमी झाले असल्याने याचा आर्थिक फटका मूर्तिकारांना बसला आहे. अमरावती जिल्ह्यासह अकोला, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यातील अनेक सार्वजनिक मंडळात अमरावतीतील मूर्तींची स्थापना केली जाते. कोरोनामुळे मूर्ती या चार फुटांपेक्षा अधिक उंचीच्या नसव्यात असे शासनाचे निर्देश आहेत. त्यामुळे इतर जिल्ह्यातील सार्वजनिक मंडळ गणेशोत्सवासाठी त्यांच्याच गावातून गणपती घेत असल्याने अमरावती शहरातील मूर्तिकारांपासून त्यांचे अनेक ग्राहक दुरावले आहे.प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांचा पेच कायमअमरावती शहरात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनविणे आणि विक्रीस अमरावती महापालिकेने बंदी घातली होती. मूर्तिकारांनी मात्र कोरोना काळातील आर्थिक परिस्थितीचा विचार करता प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्यांवरील बंदी उठविण्याची विनंती केली होती. महापालिका प्रशासनाने मूर्तिकारांना दिलासा दिला होता. यावर्षी प्लॅस्टर ऑफ पॅरिस बाबत महापालिकेने अद्याप काही एक स्पष्ट केले नसल्याने प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांबाबत पेच कायम आहे.

हेही वाचा - पाकिस्तानमधील त्या नराधमाचे पोलिसांनी केले एनकाऊंटर; कबरीतून मृतदेह काढत 14 वर्षीय मुलीवर केला बलात्कार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.