अमरावती - महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे ( Sant Gadge Baba Amravati University ) कुलपती भगत सिंह कोश्यारी ( Bhagat singh Koshyari ) यांनी 26 ऑक्टोबर 2020 चा तत्कालीन कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर ( Murlidhar Chandekar ) यांचा व्यवस्थापन परिषदेवरील राज्यपाल नामीत सदस्य प्रा. दिनेश सूर्यवंशी ( Dinesh Suryavanshi ) यांना व्यवस्थापन परिषदेतून अपात्र करण्याच्या निर्णयाला अवैध ठरविले असून त्या संदर्भातील डॉ. चांदेकर यांचा निर्णय हा खारीज केला आहे. यामुळे आता प्रा. दिनेश सूर्यवंशी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेत राज्यपाल नामीत सदस्य म्हणून पुन्हा सक्रिय होणार आहेत.
असा आहे राज्यपालांचा निर्णय - राज्यपालांनी माजी कुलपती डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या निर्णयाला खारीज करताना दिलेल्या निर्णयांमध्ये डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी विद्यापीठ कायद्यातील विविध तरतुदींचा भंग करून विद्यापीठाच्या कुलपतीना म्हणजेच राज्यपालांना न कळवता परस्पर कुलपती या नात्याने राज्यपालांना असलेल्या अधिकारचा स्वतः वापर करून दिनेश सूर्यवंशी यांना राज्यपाल नामीत व्यवस्थापन परिषद सदस्य म्हणून अपात्र करणे, हे महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यातील तरतुदींच्या विरोधातील कृत्य आहे. त्यामुळे महाराष्ट्र विद्यापीठ कायदा 2016 च्या राज्यपालांना असलेल्या अधिकारावर अतिक्रमण झाले. डॉ. मुरलीधर चांदेकर यांना कायदेशीर अधिकार नसताना त्यांनी दिनेश सूर्यवंशी यांना व्यवस्थापन परिषदेत करून अपात्र केले, असे स्पष्टपणे निर्णयात नमूद करण्यात आले आहे. डॉ. चांदेकर यांना दिनेश सूर्यवंशी यांना अपात्र करण्याचा अधिकार नसताना अपात्र करण्याच्या निर्णयाच्या कृतीमुळे महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यातील कलम 9(4 ) 9( 5 ) चा भंग झाल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
प्रा. सूर्यवंशी पुन्हा सक्रिय - राज्यपालांनी तत्कालीन कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांचा प्रा. दिनेश सूर्यवंशी यांना व्यवस्थापन परिषदेवरून अपात्र करण्याचा निर्णय खारीज केल्यामुळे व बेकायदेशीर ठरवल्यामुळे प्रा. दिनेश सूर्यवंशी हे विनाविलंब पुन्हा एकदा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे राज्यपाल नामीत सदस्य म्हणून सक्रिय झालेले आहेत.
हेही वाचा - Shiv Sena Office Attacked : अमरावतीत खळबळ.. राणा समर्थकांनी केला शिवसेनेच्या कार्यालयावर हल्ला