ETV Bharat / city

Tukdoji Maharajs Death Anniversary : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाला प्रारंभ; 14 ऑक्टोबरला मौन श्रद्धांजली - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव

संपूर्ण विश्वाला मानवतेचा संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा 54 वा पुण्यतिथी महोत्सव आज पासून गुरुकुंज मोझरी येथे प्रारंभ झाला आहे. 15 ऑक्टोबरला या महोत्सवाची सांगता होणार आहे.

Tukdoji Maharajs Death Anniversary
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव
author img

By

Published : Oct 8, 2022, 2:55 PM IST

अमरावती: संपूर्ण विश्वाला मानवतेचा संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा 54 वा पुण्यतिथी महोत्सव आज पासून गुरुकुंज मोझरी येथे प्रारंभ झाला आहे. 15 ऑक्टोबरला या महोत्सवाची सांगता होणार आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाला प्रारंभ; 14 ऑक्टोबरला मौन श्रद्धांजली

तीर्थस्थापना व चरण पादुका पूजन : पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने तुकडोजी महाराज यांची महासमाधी ही आकर्षक अशा रंगीबिरंगी फुलांनी सजवण्यात आली. महाद्वार आणि गुरुकुंज आश्रम हे आकर्षक अशा रोषणाईने झगमगवून गेले. शनिवारी पहाटे साडेचार वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीजवळ तीर्थस्थापना आणि चरण पादुकाचे पूजन करण्यात आले आहे. यावेळी अखंड वीणा वादनासह महोत्सवाला प्रारंभ झाला. गुरुकुंज मोझरी येथे सकाळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात आली आहे.

असे होते राष्ट्रसंतांचे कार्य : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म 28 एप्रिल 1919 रोजी अमरावती जिल्ह्यातील यावली येथे झाला. त्यांचे मूळ नाव माणिक बंडोजी इंगळे असे होते. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या समाज प्रबोधनाचे खास वैशिष्ट्य होते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे केवळ राष्ट्रालाच देव मानणारे संत होते त्यांनी आपल्या सामाजिक कार्यात केवळ देशाच्या विकासाचा विचार केला. तुकडोजी महाराजांनी आपल्या कीर्तनाच्या व खंजिरी भजनाच्या माध्यमातून समाजसेवा व राष्ट्र निर्माण हे हेच ध्येय ठेवले. परंपरागत अनिष्ट रूढी, जाती, धर्म ,पंथ भेद , अंधश्रद्धा आदी समाज घातक गोष्टींवर कठोर प्रहार राष्ट्रसंतांनी केला. आपले भजन तसेच लिखाणाद्वारे त्यांनी जगाला विश्व मानवतेचा बंधूभावनेचा मार्ग दाखविला त्यामुळे सर्व धर्माचे सर्व पंथाचे लोक त्यांच्याकडे आकर्षित झाले आत्मसंयमाचा आणि देशभक्तीचा विचार त्यांनी आपल्या ग्रामगीता या काव्यातून रुजविला व त्याचा प्रचार करण्यासाठी त्यांनी बरेच श्रम घेतले गुरुदेव सेवा मंडळ स्थापले व्यायामाचे महत्त्व सांगण्यासाठी आदेश रचना हा ग्रंथ देखील त्यांनी लिहिला ते सत्याग्रह चळवळीत देखील सहभागी झाले होते. तुकडोजी महाराजांनी राष्ट्रीय कार्यातच आपले जीवन समर्पित केले विश्वधर्म विश्वशांती परिषदेसाठी ते 1956 मध्ये जपानला गेले होते. त्यांच्या भजनाने अनेक परदेशी विद्वान मोहित झाले. 1966 मध्ये प्रयाग येथे विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदाचा मान त्यांना मिळाला होता. सर्व धर्म जाती पंथ यांच्या पलीकडे असलेल्या ईश्वराचे स्वरूप ते आपल्या भाषणातून प्रकट करीत होते.

असे आहे महोत्सवातील रोजचे कार्यक्रम : पुण्यतिथी महोत्सवात रोज सकाळी साडेपाच ते साडेसहा दरम्यान सामुदायिक ध्यानावर शंकर महाराज, विठ्ठलदास कोहळे, सचिन देव, सीमा तायडे ,विजया देवी ,रामप्रियाजी, प्रकाश वाघ आपले चिंतन व्यक्त करणार आहेत. सकाळी सात ते आठ या वेळेत योगाचार्य तुलसीदास कपाळे योगासन आणि प्राणायामाचे प्रशिक्षण गुरुदेव भक्तांना देणार आहेत. सकाळी आठ ते नऊ या वेळात रामटेक येथील अमृता कडूकर यांच्यासह सुधीर बोराळे, निळकंठ हळदे, रामदास चोरोडे, राम मरकाडे, दिलीप कोहळे हे ग्रामगीता वाचन करतील. महोत्सवात रोज सकाळी नऊ ते पाच वाजे दरम्यान राज्यस्तरीय कीर्तन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. रोज सायंकाळी सहा ते सात या वेळेस सामुदायिक प्रार्थना व प्रार्थना याच्या महत्त्वावर संकेत काळे, कैलास दुरतकर, डॉ. प्रशांत ठाकरे, निलेश गावंडे, पुष्पा बोंडे, आनंद देव स्वामी , लक्ष्मण गमे हे आपले चिंतन व्यक्त करतील महोत्सवात कीर्तन व खंजिरी भजनाचा कार्यक्रम देखील होणार आहे. 11 ऑक्टोबरला या महोत्सवात आयोजित कीर्तन स्पर्धेचा समारोप आणि बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. 12 ऑक्टोबरला महिला संमेलन देखील होणार आहे.

मौन श्रद्धांजली वाहण्यास देश विदेशातील गुरु भक्तांची उपस्थिती : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना 14 ऑक्टोबरला मौन श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. हृदयस्पर्शी अशा या सोहळ्याला अनेक संत महंत तसेच भारतासह परदेशातील गुरुभक्त, राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत. 14 ऑक्टोबरला सकाळी दहा ते बारा या वेळेत अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ता संमेलन होईल दुपारी अडीच ते तीन या वेळेत श्री सद्गुरु अडकोजी महाराज संस्थान व राष्ट्रसंत जन्मभूमी येथील पालख्यांचे स्वागत आणि पूजन करण्यात येईल. दुपारी तीन ते सहा या वेळात मौन श्रद्धांजली आणि सर्व धर्मीय सामुदायिक प्रार्थना होईल. सायंकाळी सहा ते सहा 45 पर्यंत जर्मनी येथील मिस लॉराबस्टर या राष्ट्रसंतांवर भजन सादर करतील. गुरुकुंज येथील मानव सेवा छात्रालयाचे विद्यार्थी स्वर गुरुकुंज याचा हा या कार्यक्रमासह अभंग गातील.

15 ऑक्टोबरला शोभायात्रा : महोत्सवाच्या समारोपीय दिवशी सकाळी साडेसहा वाजता ध्वजारोहण सोहळा आयोजित करण्यात आला आहे त्यानंतर विविध गावातून आलेल्या पालख्यांची शोभायात्रा काढण्यात येईल. सकाळी दहा वाजता एकनाथ राऊत महाराज हे काल्याचे किर्तन करतील आणि त्यानंतर महाप्रसाद वितरित केला जाणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.