ETV Bharat / city

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी ही ठगबाजांची आघाडी - मुख्यमंत्री

मुख्यमंत्री म्हणाले, आज देशाची धुरा ही देशाचा मान, स्वाभिमान आणि सन्मान राखणाऱ्या हातात आहे. यावेळी विक्रमी विजय निश्चित असल्याचा ते म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषण करताना
author img

By

Published : Apr 15, 2019, 7:30 AM IST

अमरावती - काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी ही ठगबाजांची आघाडी आहे. हे पुन्हा एकदा देशाला ठगण्यासाठी एकत्र आले आहेत. देशाला पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांची गरज आहे. त्यांचे हात बळकट करण्यासाठी अडसुळांना पुन्हा एकदा संधी देण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. ते परतवाडा येथील जाहीर सभेत बोलत होते.

अमरावती लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आनंद अडसूळ यांच्या प्रचारासाठी परतवाडा येथील नेहरू मैदानावर मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेला संबोधित केले. मुख्यमंत्री म्हणाले, आज देशाची धुरा ही देशाचा मान, स्वाभिमान आणि सन्मान राखणाऱ्या हातात आहे. यावेळी विक्रमी विजय निश्चित आहे, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषण करताना

पुढे ते म्हणाले की, राहुल गांधी गरिबीमुक्त करण्याची भाषा करीत आहेत. खरे तर त्यांचे पणजोबा, आजी, वडील आणि आईने यापूर्वी गरिबी हटविण्याची भाषा केली होती. मात्र देशातील गरिबी हटली नाही. आज केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच गरिबीमुक्त भारत करू शकतात, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परतवाडा येथे आयोजित जाहीर सभेत व्यक्त केला. यावेळी खासदार आनंद अडसूळ,अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे, गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, दर्यापूरचे आमदार रमेश बुंदीले, मेळघाटचे आमदार प्रभूदास भिलावेकर, माजी खासदार अनंत गुढे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. दिनेश सुर्यवंशी आदी उपस्थित होते.

Intro:केवळ नरेंद्र मोदीच करू शकतात गरिबीमुक्त भारत या बतमीसाठी विडिओ

Body:केवळ नरेंद्र मोदीच करू शकतात गरिबीमुक्त भारत या बतमीसाठी विडिओ

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.