ETV Bharat / city

मेळघाटातील ब्रिटिशकालीन पूल धोकादायक स्थितीत; अपघाताची शक्यता! - पूल धोकादायक स्थितीत

काही पूल ब्रिटिशकालीन असल्याने ते अक्षरशः मोडकळीस आले आहेत. अनेक पुलांची पावसामुळे दुरवस्था झालीय. तर अरुंद पूल असल्याने ते धोकादायक ठरताहेत. पुलावरून पाणी वाहत असल्यावर अनेक गावाचा संपर्क तुटतो. त्यामुळे अशा ठिकाणी नव्या पुलांची उभारणी करण्याची मागणी होत आहे.

मेळघाटातील ब्रिटिशकालीन पूल धोकादायक स्थितीत; अपघाताची शक्यता!

author img

By

Published : Jul 28, 2021, 12:14 PM IST

अमरावती : पावसाळा सुरू झाला की मेळघाटातील अनेक रस्त्यांची दैनावस्था होते. दऱ्याखोऱ्यांत वसलेल्या मेळघाट परिसरात पुलांवरून पाणी आलं की संपर्क तुटतो. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात मुख्य मार्गावर एकूण ११८ पूल आहेत. यापैकी २० पूल वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक बनले आहेत. काही पूल ब्रिटिशकालीन असल्याने ते अक्षरशः मोडकळीस आले आहेत. अनेक पुलांची पावसामुळे दुरवस्था झालीय. तर अरुंद पूल असल्याने ते धोकादायक ठरताहेत. पुलावरून पाणी वाहत असल्यावर अनेक गावाचा संपर्क तुटतो. त्यामुळे अशा ठिकाणी नव्या पुलांची उभारणी करण्याची मागणी होत आहे. सध्या परतवाडा सीमाडोह रस्त्यावर असलेला भूतखोरा पूल पावसाने नुकसानग्रस्त झाल्याने या मार्गाची वाहतूक बंद करण्यात आलीय.

मेळघाटातील ब्रिटिशकालीन पूल धोकादायक स्थितीत; अपघाताची शक्यता!
वनविभागाची परवानगी गरजेची

या पुलांच्या बांधणीसाठी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची परवानगी आवश्यक आहे. काही पुलांच्या बांधकामासाठी वनविभागाची परवानगी मिळाली आहे. तर काहींचा पाठपुरावा सुरु आहे. वनविभागाची परवानगी लवकर मिळत नसल्याने उर्वरित कामे थांबली असल्याने त्याचा पत्रव्यवहार सुरु असल्याचं सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेहत्रे यांनी सांगितले आहे.

आदीवासी त्रस्त

मेळघाटमध्ये मोठा व्याघ्र प्रकल्प आहे आणि या व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या रस्त्यांचीही प्रचंड दुरवस्था झाली आहे. रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी वनविभागाची परवानगी गरजेची आहे. रस्त्यांच्या दयनीय अवस्थेमुळे मेळघाटातील आदीवासी बांधवांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत असल्याचे आदीवासींचे म्हणणे आहे. या रस्त्यांच्या तातडीने दुरूस्तीची मागणी आता होताना दिसत आहे.

पर्यटकांनाही करावा लागतो त्रासाचा सामना
मेळघाटमधील चिखलदरा हे पर्यटनस्थळ विदर्भाचं काश्मीर म्हणून ओळखलं जातं. इथे दरवर्षी लाखो पर्यटक पावसाळ्यात पर्यटनासाठी येत असतात. परंतु परतवाडा ते चिखलदरा या रस्त्याचीही अशाच प्रकारे दुरवस्था झाल्याने पर्यटकांनाही त्रासाचा सामना करावा लागतो.
हेही वाचा - पूरग्रस्तांना निकषांपेक्षा अधिक मदत देण्याची राज्य सरकारची तयारी, मंत्रिमंडळ बैठकीत होणार निर्णय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.