अमरावती - कालच मी शरद पवारांना (Sharad Pawar) विनंती केली होती, इथ शेतकऱ्यांचा असंतोष आहे. शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही. मदत मिळाली नाही, धानाला बोनस जाहीर झाला नाही. संत्र्यांची नुकसान भरपाई मिळाली नाही. एसटी कामगारांचा संप आहे. म्हणून असंतोष आहे. त्यामुळे शरद पवार साहेबांनी येऊ नये. असंतोष, अस्वस्थता त्यांना त्यांच्या नागपूरच्या दौऱ्यात दिसला असेल. त्यामुळे त्यांची अस्वस्थता वाढली असेल म्हणून त्यांनी वर्धा यवतमाळ येथील दौरा रद्द केला आहे, अशी टीका भाजपा नेते डॉ. अनिल बोंडे (BJP leader Dr. Anil Bonde Allegations) यांनी केली आहे. तसेच माझी डॉक्टर या नात्याने शरद पवारांना विनंती आहे. त्यांनी त्यांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी, कारण विदर्भातील हवामान राष्ट्रवादीला पोषक नाही. त्यामुळे शरद पवारांनी त्यांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी, असा उपरोधीक सल्लाही अनिल बोंडे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना दिला आहे.
संजय राऊतांची उडवली खिल्ली
काही दिवसांपूर्वी बोलताना संजय राऊत म्हणाले होते, शरद पवार हे कधीच खोटं बोलत नाही. संजय राऊत यांच्या या विधानाला अनिल बोंडे यांनी उत्तर दिल आहे. संजय राऊत म्हणतात शरद पवार कधीच खोटं बोलत नाही, हे असे म्हणण्यासारखे आहे की मांजरीने म्हनाव की मी उंदीर खात नाही, असे म्हणत संजय राऊत यांच्या वक्तव्याची अनिल बोंडे यांनी खिल्ली उडवली आहे.
हेही वाचा - राज्याचे गृहमंत्री हे हतबल आणि ..... हे म्हणत भाजप नेते अनिल बोंडेंंचा सरकारवर निशाणा