ETV Bharat / city

विशेष : भिकाऱ्यांच्या वाढत्या संख्येने अमरावतीकर त्रस्त, कायद्याच्या अंमलबजावणीची मागणी - Amravati problems news

भीक मागण्यासंदर्भात कायदा अस्तित्वात असताना अमरावती शहरात या कायद्याची हवी तशी अंमलबजावणी होत नसल्याने भिकाऱ्यांचा विचित्र त्रासाचा सामना सध्या अमरावतीकरांना करावा लागतो आहे.

Amravati
Amravati
author img

By

Published : Dec 10, 2020, 3:14 PM IST

अमरावती - गत काही दिवसांपासून अमरावती शहरात भिकाऱ्यांची संख्या वाढली आहे. विशेष म्हणजे शहरातील महत्त्वाच्या चौकात सिग्नलवर थांबणाऱ्या वाहनचालकांना भीक मागणाऱ्या लहान मुलांकडून प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. महिला, युवती यांना तर सिग्नलवर थांबणे म्हणजे संकट ओढवून घेणे, असा अनुभव येतो आहे. भीक मागण्यासंदर्भात कायदा अस्तित्वात असताना अमरावती शहरात या कायद्याची हवी तशी अंमलबजावणी होत नसल्याने भिकाऱ्यांचा विचित्र त्रासाचा सामना सध्या अमरावतीकरांना करावा लागतो आहे.

असा होतो त्रास

सिग्नलवर उभ्या असणाऱ्या मोठ्या चारचाकी वाहनांनासमोर भीक मागणारी लहान मुले उभी राहतात.कधी वाहनांच्या बोनेटवर चढतात. दाराच्या काचा दगडाने वाजवतात. अचानक गाडीच्या समोर येणारी ही मुले चुकून गाडीखाली आली तर किती मोठे संकट आपल्यावर कोसळेल असा प्रश्न बांधकाम व्यवसायिक सचिन वानखडे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना उपस्थित केला. सिग्नलवर दुचाकी उभी राहिली, की भीक मागणारी मुले अंगाला हात लावून पैसे मागतात. एकदा तर एक मुलगा चक्क माझ्या दुचाकीच्या समोर मांडी घालून बसला. या प्रकारामुळे मी घाबरून ओरडली. तेव्हा काही माणसांनी त्याला हाकलले. हे असे काही विचित्र होणे म्हणजे मोठा अपघात होण्याचीच चिन्ह असल्याचे शिक्षिका शरयू चव्हाण म्हणाल्या.

भिकारी झालेत सेटल

अमरावती शहरात अनेक सेवाभावी संस्था शहरातील महत्त्वाच्या चौकात भिकाऱ्यांना मोफत जेवण देत आहेत. आयते पोट भरल्यावर चौकात भीक मागून दिवसभरात या लोकांकडे चांगला पैसाही येत असल्यामुळे हे भिकारी एक प्रकारे सेटल झाले आहेत. खरे तर या लोकांना मोफत जेवण देणे बंद व्हायला हवे आणि नागरिकांनी या लोकांना अजिबात पैसे द्यायला नको हे असे झाले तर शहरातील भिकाऱ्यांचा त्रास संपुष्टात येईल. यासाठी जनजागृतीची गरज असल्याचे जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी अतुल भडांगे म्हणाले.

अमरावतीत पहिल्यांदा बेगिंग अ‌ॅक्टनुसार कारवाई

शहरातील महत्त्वाच्या चौकात भिक मागणाऱ्या लहान मुलांच्या विषयावर 15 दिवसांपूर्वी पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी बैठक घेतली होती. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मनीष खंडपासोळे यांनी बेगिंग अ‌ॅक्टचा विषय मांडला होता. या कायद्यानुसार कारवाई करता येईल का, याबाबत पोलीस अधिकरी विचारमंथन करीत असताना गाडगेनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी लहान मुलांना जबरदस्तीने भीक मागायला लावणाऱ्या दोघांविरुद्ध बेगिंग अ‌ॅक्टअंतर्गत कारवाई केली. अमरावती शहराच्या इतिहासात बेगर्स अ‌ॅक्टची ही पहिली कारवाई असल्याचे सांगण्यात येते.

Amravati

लॉकडाऊनमुळे वाढले भिकारी

कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यावर शहरात भिकाऱ्यांची संख्या वाढली आहे. अमरावती रेल्वे स्थानकावरून सध्या गाड्या धावत नसल्यामुळे रेल्वेत भीक मागणारे अनेक भिकारी शहराच्या मुख्य चौकात भीक मागत आहेत.

भीक मागण्याची व्याख्या

सार्वजनिक ठिकाणी भिक मागण्यासाठी गाणे म्हणणे, नृत्य करणे, भविष्य सांगणे, भीक मागण्यासाठी शरीरावर झालेली जखम दाखविणे, अपंगत्वाचे प्रदर्शन करणे.

कायदा काय म्हणतो?

1960च्या बेगिंग कायद्यानुसार भीक मागणाऱ्या व्यक्तीला कायद्यानुसार नियुक्त असलेल्या व्यक्तीला अटक करून न्यायालयात हजार करता येऊ शकते. भीक मागणाऱ्या व्यक्तीस जास्तीत जास्त तीन वर्षाची शिक्षा होऊ शकते. भीक मागताना दुसऱ्यांदा अटक झाल्यास न्यायलायने प्रमाणित केलेल्या संस्थेत 10 वर्ष ठेवण्यात येईल आणि 2 वर्षांचा कारावासही होई शकते.

..तर भिकाऱ्यांचे पुनर्वसन शक्य

भीक मागणे हा गुन्हा आहे आणि लहान मुलांना भीक मागायला लावणे हा अतिशय गंभीर गुन्हा आहे. प्रशासनाने इच्छाशक्ती दाखवली तर भीक मागणाऱ्या प्रत्येक बालकाचे पुनर्वसन शक्य असक्याचे सामाजिक कार्यकर्ते मनीष खंडपासोळे म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.