अमरावती - अमरावती जिल्ह्याचा विकास व्हावा यासाठीच माझी धडपड आहे. ज्या ठिकाणी केंद्राकडून निधीची गरज भासते अशा ठिकाणी मी सतत पाठपुरावा करते. जिल्ह्यात विविध भागात पाणीपुरवठा योजनेसाठी केंद्राकडून 50 टक्के निधी मिळवून ( Melghat Water Crisis ) दिला. असे असताना चांदूरबाजार, अचलपूर आदी विविध ठिकाणी या कामांच्या भूमिपूजन सोहळ्याला राज्यातील आमदार मंत्र्यांना बोलाविले जाते. मात्र खासदार म्हणून मला साधे निमंत्रणही दिले जात नसल्याबाबत खासदार नवनीत राणा यांनी आज जिल्हा विकास समन्वय व नियंत्रण समितीच्या सभेत रोष व्यक्त केला.
हेही वाचा - Melghat Water Scarcity : गावात टँकर येताच विहिरीवर तुटून पडते सगळे; मेळघाटच्या खडीमलमध्ये भीषण पाणीटंचाई
हेही वाचा - Melghat Water Crisis : मेळघाटात बादलीभर पाण्यासाठी त्राहीत्राही, 1500 गावकरी 2 टँँकर पाण्यावर!
हेही वाचा - Melghat Water Crisis : मेळघाटातील नागरीक गढूळ पाण्याने त्रस्त; खासदार मात्र हनुमान चालिसा म्हणण्यात व्यस्त
जिल्हाधिकार्यांनी दिले चौकशीचे आदेश - जिल्ह्यातील विकास कामांचे भूमिपूजन तसेच उद्घाटन सोहळ्याला खासदारांना निमंत्रित करणे, हा प्रोटोकॉल असताना खासदारांना ज्या भूमिपूजन सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले नाही. यामागे नेमके काय कारण होते. याची चौकशी निवासी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पवणीत कौर यांनी नियोजन भवन येथे आयोजित जिल्हाविकास समन्वय व सनियंत्रण समिती सभेदरम्यान खासदारांनी तक्रार करताच दिले आहेत.
मेळघाटातील पाणी समस्येबाबत खासदार संतापल्या - केंद्राकडून हवा तो सर्व निधी आणून देखील मेळघाटातील अतिदुर्गम भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात नसल्याबाबत खासदार नवनीत राणा यांनी रोष व्यक्त ( Navneet Rana On Melghat Water Crisis ) केला. मेळघाटातील खडीमनसह अनेक गावांमध्ये पाण्याची भीषण समस्या असलेले वृत्त सर्व वृत्तवाहिन्यांवर धडकले आणि याबाबत खासदार म्हणून मलाच जबाबदार धरण्यात आले. ही अतिशय गंभीर बाब आहे. मेळघाटातील ज्या गावांमध्ये वीज समस्या आहे. याबाबत मी वर्षभरापासून वीज पुरवठा करण्याबाबत केंद्राकडून केलेल्या पाठपुराव्यानंतर देखील अधिकाऱ्यांनी अनेक गावात विज पोचवली नाही. हे सुद्धा अतिशय गंभीर प्रकरण असून मेळघाटातील समस्या सोडविण्यासाठी तत्परतेने आणि प्रामाणिकपणे कामे व्हायला हवीत. अन्यथा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी निलंबनासाठी तयार राहावे, अशी तंबी देखील खासदार नवनीत राणा यांनी या बैठकीत दिली. अमरावती शहरातील पिण्याच्या पाण्याची समस्या सुद्धा त्वरित मार्गी लावावी, असे आदेश देखील खासदार नवनीत राणा यांनी दिले.
अंजनगाव बारीत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा - भिवापूर तलाव तुटल्यामुळे अंजनगाव बारी परिसरात कोंडेश्वर तलावातून पाणीपुरवठा केला जात होता. मात्र सध्या स्थितीत अंजनगाव बारीला गढूळ पाण्याचा पुरवठा केला जातो. या ठिकाणी पाईपलाईनचे काम पूर्ण झाले नसल्यामुळे ऑक्टोबरपर्यंत अंजनगाव बारी येथे पाणी पुरवठा करणे अशक्य आहे, अशी माहिती अधिकार्यांनी सभेत दिली असताना खासदार नवनीत राणा यांनी चार महिने अंजनगाव बारी येथील रहिवासी कुठले पाणी पिणार असा प्रश्न केला. काही झाले तरी काम पाईपलाईनचे काम होईस्तोवर अंजनगाव बारी येथील रहिवाशांना पिण्याच्या पाण्याचा तुटवडा पडला जाणार नाही. याची खबरदारी घेण्याचे आदेश देखील खासदार नवनीत राणा यांनी यावेळी दिले.
हेही वाचा - Water Crisis: पाणी टंचाईचे सावट; अमरावती विभागातील धरणातमध्ये उरला फक्त 36 टक्के जलसाठा