ETV Bharat / city

Amravati Congress Thalinad Agitation: पंतप्रधान मोदींविरोधात अमरावती काँग्रेसचे सोमवारी 'थाळीनाद' आंदोलन

कोरोना विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ( PM Narendra Modi ) जनतेला थाळी वाजवायला लावली. मोदींनी थाळी वाजवायचे सांगितल्यावर दोन वर्षाने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर आता महागाईने ( Inflation In India ) आणि मोदी सरकारमुळे जनता त्रस्त असून दोन वर्षानंतर देशातून मोदींना घालविण्यासाठी काँग्रेसच्यावतीने सोमवारी अमरावतीत 'थाळीनाद' आंदोलन ( Amravati Congress Thalinad Agitation ) केले जाणार आहे.

Amravati Congress Thalinad Agitation
Amravati Congress Thalinad Agitation
author img

By

Published : Mar 27, 2022, 4:53 PM IST

अमरावती - कोरोना विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ( PM Narendra Modi ) जनतेला थाळी वाजवायला लावली. मोदींनी थाळी वाजवायचे सांगितल्यावर दोन वर्षाने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर आता महागाईने ( Inflation In India ) आणि मोदी सरकारमुळे जनता त्रस्त असून दोन वर्षानंतर देशातून मोदींना घालविण्यासाठी काँग्रेसच्यावतीने सोमवारी अमरावतीत 'थाळीनाद' आंदोलन ( Amravati Congress Thalinad Agitation ) केले जाणार आहे. यासंदर्भात आज शहर काँग्रेसच्यावतीने पत्रकार परिषद घेऊन ( Amravati Congress Press Conference ) याची माहिती देण्यात आली. यावेळी बोलताना, 'दोन वर्षानंतर होणार्‍या लोकसभा निवडणुकीत मोदींचा परावभ निश्चितपणे होणार', असा विश्वासही व्यक्त काँग्रेसकडून व्यक्त करण्यात आला.

अमरावतीत काँग्रेसची पत्रकार परिषद

महागाईमुळे जनता त्रस्त झाल्याचा काँग्रेसचा आरोप - देशात महागाई प्रचंड वाढली असून या महागाईमुळे जनता त्रस्त झाली असल्याचे काँग्रेसचे अमरावती शहर अध्यक्ष बबलू शेखावत यांनी म्हटले आहे. 2014 मध्ये घरगुती सिलिंडरची किंमत 417 रुपये होती आणि त्यावर 50 टक्के सबसिडी जमा होत होती. आता मात्र सिलिंडरचा दर 970 रुपये झाला असून त्यावर एक पैसा ही सबसिडी मिळत नाही. तसेच 2014मध्ये पेट्रोलची किंमत 71 रुपये लिटर होती, तर आज 111.65 रुपये लिटर झाली आहे. 2014मध्ये 55 रुपये लिटर असणारे डिझेल 94 रुपये लिटरवर गेले आहे. 2014मध्ये एक क्विंटल गव्हाची किंमत 1280 रुपये होती, तर आज एक क्विंटल गहू 2356 रुपयांवर गेला आहे. ज्वारीचे दरही 1520 रुपयांवरून 2350 रुपयांवर गेले आहे. तेलाच्या किंमतीत 25 ते 60 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाली असून घरात लागणाऱ्या प्रत्येक वस्तूचे भाव हे केंद्र सरकारने दुप्पट केले असल्याचा आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष बबलू शेखावत यांनी केला आहे.

'मोदी सरकार विरोधात अमरावतीतून आंदोलन' - थाळी वाजवून कोरोनाला पळविण्याचा प्रयोग करणाऱ्या पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात काँग्रेसच्यावतीने थाळी वाजवून आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनाची सुरुवात अमरावतीतून होणार असून सोमवारी सकाळी 11 वाजता शहरातील राजकमल चौक येथे हे थाळीनाद आंदोलन केले जाणार असल्याचे बबलू शेखावत म्हणाले. पत्रकार परिषदेला अमरावतीचे माजी महापौर विलास इंगोले, मिलिंद चिमोटे, काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते दिलीप एडतकर, सरचिटणीस किशोर बोरकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष भैया पवार, माजी नगरसेवक मुन्ना राठोड पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

हेही वाचा - Suspicious Transactions : यशवंत जाधवांनी 'मातोश्री'ला दिले 2 कोटी 60 लाख? आयकरने जप्त केलेल्या डायरीतउल्लेख

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.