अमरावती मेळघाटातील आदिवासी बांधवांना आज देखील डॉक्टर आणि दवाखान्यावर विश्वास नाही. येथे कुपोषण आणि माता मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. शासकीय वैद्यकीय यंत्रणा आणि अनेक स्वयंसेवी संस्था या भागात प्रामाणिकपणे काम करत असली, तरी आदिवासी बांधवांचा superstitions in Melghat विश्वास हा बाबा आणि भूमिका यांच्यावरच अधिक आहे. मेघाचे आरोग्य सुदृढ व्हावे, Ajit Pawar Melghat Visit यासाठी या भागात अंधश्रद्धा निर्मूलनासाठी प्रबोधनाची अत्यंत गरज असल्याचे महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी म्हटले आहे.
अजित पवारांनी 3 गावांची केली पाहणी मेघाटातील कुपोषणाचा प्रश्न जाणून घेण्यासाठी आज अजित पवार यांनी मेळघाटात धारणी तालुक्यात येणाऱ्या दिदम्बा, कळमखार आणि नारवाटी या 3 गावांना भेट देऊन गावातील कुपोषित बालकांची पाहणी करून या कुपोषित बालकांच्या कुटुंबीयांशी चर्चा केली आहे. या भागात आदिवासी बांधव पारंपारिक पद्धतीने त्यांच्या शेतात घेत असलेले धान्य आता घेऊ शकत नाही. Ajit Pawar Melghat Visit ही प्रमुख अडचण आदिवासी बांधवांनी बोलून दाखवल्याचे अजित पवार म्हणाले. मेळघाटातील पौष्टिक धान्य आदिवासी बांधवांना घेता यावे. यासाठी कृषी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून यासंदर्भात अधिवेशन काळात शासनाला सुद्धा माहिती दिली जाईल, असे अजित पवार म्हणाले.
प्रसूती काळात महिलांना मिळावी ठराविक रक्कम शासकीय सेवेत असणाऱ्या महिलांना प्रसूतीपूर्वी 3 महिने सुट्टी दिली जाते आणि प्रसुतीनंतर देखील तीन महिन्याची रजा मिळते. मेळघाटातील आदिवासी महिलांना देखील त्यांच्या प्रसूतीच्या काळात 3 महिने त्यांना पौष्टिक आहार मिळावा. Ajit Pawar Melghat Visit प्रसूतीनंतर देखील त्यांना पौष्टिक आहार मिळावा. तसेच त्यांना देखील 6 महिने विशेष अशी रक्कम शासनाकडून मिळावी. यासाठी शासनाकडे मी मागणी करणार असल्याचे देखील अजित पवार म्हणाले.
मेळघाटातील रस्त्यांसाठी खासदारांनी पुढाकार घेण्याची गरज मेळघाटातील रस्ते हे अतिशय खराब आहेत. केवळ मेळघाटतच नाही तर राज्यात ज्या भागातील व्याघ्र प्रकल्प आणि जंगलांमधून रस्ते जातात. त्या संपूर्ण रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी वनविभागाकडून परवानगी घ्यावी लागते. हे अतिशय किचकट असून सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात काही नियम आखून दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश हे कायदाच असून या कायद्यामध्ये काही सुधारणा करावयाची असेल तर यासाठी खासदारांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे असे देखील अजित पवार यावेळी म्हणाले.