अमरावती प्रत्येक महिला आर्थिक साक्षर झाली तर स्वत:ची, कुटुंबाची, समाजाची आणि मग गावाची प्रगती व्हायला वेळ लागणार नाही, त्यामुळे प्रत्येक महिलेने आर्थिक साक्षर आणि सक्षम व्हायलाच हवं, असा महत्त्वपूर्ण सल्ला माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी (Yashomati Thakur on womans empowerement) दिला. मोर्शी तालुक्यांतील नेरपिंगळाई येथील नवतेजस्विनी आधुनिक शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्याहस्ते पार पडले. यावेळी आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभेत त्या बोलत (Adv Yashomati Thakur statement in Amravati) होत्या.
अन यशोमती ठाकुरांनी चालवली शिलाई मशीन महिला आर्थिक विकास महामंडळ, अमरावती द्वारा संचलित मोर्शीमधील झेप लोकसंचलित साधन केंद्र नेरपिंगळाई, माहेर लोकसंचलित साधन केंद्र, लेहगाव यांच्यावतीने नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत नवतेजस्विनी आधुनिक शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्याहस्ते पार पडले. यावेळी आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभेत ॲड. यशोमती ठाकूर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन (Adv Yashomati Thakur statement) केले.
कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसतं, असा विचार जनमाणसात रुजविणाऱ्या माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज स्वत: शिलाई मशीन चालवून मोर्शीमधील महिलांना शिवणकामाचे प्रात्यक्षिक करून दाखविले. यावेळी सर्व महिलांना मार्गदर्शन करताना ठाकूर यांनी थेट शिलाई मशीनची धुरा हाती घेतली. महिलांमध्ये आत्मविश्वास वाढावा, या प्रमुख उद्देशाने ठाकूर यांनी मशीन चालवूनही दाखवत शिवणकामाचे धडे गिरवले. (Adv Yashomati Thakur)
अगरबत्ती केंद्राचे उद्धाटन यावली, येथे महिला आर्थिक विकास महामंडळ, अमरावती द्वारा संचलित संत तुकडोजी महाराज लोकसंचलित साधन केंद्र, माहुलीच्या वतीने अगरबत्ती निर्मिती उद्योग केंद्राचे उद्घाटनही ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी वार्षिक सर्वसाधारण सभेला देखील त्यांनी संबोधित केले. यावेळी मोर्शीमधील झेप लोकसंचलित साधन केंद्र नेरपिंगळाई, माहेर लोकसंचलित साधन केंद्र, लेहगाव आणि संत तुकडोजी महाराज लोकसंचलित साधन केंद्राचे सर्व प्रशिक्षणार्थी आणि महिला आर्थिक विकास मंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, विविध बँकांचे व्यवस्थापक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित (Yashomati Thakur on womans empowerement) होते.