ETV Bharat / city

Viral video : चक्क बापानेच पाजली मुलांना दारू, अमरावती जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार - वडिलांनी स्वतः मुलांना दारू पाजली

अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील कौंडण्यपूर या गावात चक्क बापानेच आपल्या चिमुरड्याना दारू ( Alcohol ) पाजल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल ( Viral video ) होत आहे. जन्मदात्या बापानेच आपल्या मुलांना दारू ( Father himself fed alcohol to children ) पाजण्याचा प्रकार समोर आला आहे.

Father himself fed alcohol to children
चक्क बापानेच पाजली मुलांना दारू
author img

By

Published : Jul 23, 2022, 9:00 PM IST

Updated : Jul 23, 2022, 9:10 PM IST

अमरावती - आपल्या जन्मदात्या बापानेच आपल्या मुलांना दारू पाजण्याचा ( Father himself fed alcohol to children ) प्रकार समोर आला आहे. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील कौंडण्यपूर गावात हा धक्कादायक घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. आपल्या तीन मुलांना सोबत घेऊन वडील दारू पाजत असतानाचा व्हिडिओ व्हायरल ( Viral video ) झाला आहे. असंस्कारी या बापाच्या कृत्यामुळे समाजातून संताप व्यक्त केल्या जात आहे.

व्हायरल व्हिडिओ

व्हिडीओ व्हायरल - तसं म्हटलं तर बापाने लपून छपून दारु पिण्याचे दिवसही केव्हाचेच मागे सरलेत. पण दिवस इतकेही पुढारलेपणाचे आलेले नाहीत, की बाप चक्क आपल्या चिमुरड्या पोरांसोबत दारु ढोसेल. इतकंच काय तर त्यांनाही दारु पाजेल! हे काही पुढारलेपणाचं लक्षण नक्कीच नाही. पण असा विचित्र प्रकार समोर आला आहे. ही घटना अमरावतीची असल्याचं सांगितले जात आहे्. एक बाप आपल्याच चिमुरड्या पोरांना दारु पाजतोय. एकूण पाच लोकं मिळून दारुची पार्टी करतायत. यात एक अल्पवयीन मुलगाही दिसतोय. एक लहान मुलगी, एक अगदीच चिमुरडा आहे. या सगळ्यांसोबत चिमुरड्यांचा बापही समोर बसलाय. तर, पाचवा व्यक्ती व्हिडीओ काढतोय. दारु पार्टीचा हा झिंगाट व्हिडीओ काढताना सगळ्यांनाच मजा येत होती.

हेही वाचा - Nashik Crime News : नाशिकच्या युवकाचे लडाखमध्ये अपघाती निधन; सहलीला मित्रांसह बुलेटवरून युवकाचा प्रवास

बापानेच पाजली दारू - अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील कौडण्यपूर ते अंजनसिंगी रोडवरील हा प्रकार आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातील देउरवाड़ा गावातील बाप नेमके आपल्या पोरांवर कसले संस्कार करतोय, यावरुन चर्चांना उधाण आलंय. मुलांच्या जडणघडणीमध्ये आई-वडिलांची भूमिका खूप महत्त्वाची असते. परंतु या व्हिडिओमध्ये बापाने चक्क आपल्या पोटच्या मुलांना दारू पाजली आहे. दारू पाजतांना बापाच्या चेहऱ्यावर आनंद ही दिसत आहे. आई-बाप हे दोघंही मुलांच्या पालन पोषणात, मुलांना शिस्त लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. खरंतर आई मुलांचे लाड करतो, बाप पोरांना शिस्त लावण्याची महत्वाची भूमिका पार पाडत असतो. दारू किंवा इतर तत्सम व्यसन हे मुलांच्या नजरेत पडू नये यासाठी पालक योग्य ती काळजी घेतांना दिसतात. परंतु या असंस्कारी बापाने पोटाच्या गोळ्याला दारू पाजल्याने चर्चेला चांगलेच उधान आले आहे.

हेही वाचा - WhatsApp Hacking: विद्यार्थिनीचे व्हॉट्सॲप अकाउंट हॅक;अश्लील व्हिडिओ पाठवणार्‍याला अटक

Last Updated : Jul 23, 2022, 9:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.