अमरावती - जिल्हा आणि अमरावती शहरात कोरोनाचा कहर कायम आहे. राज्यातील महत्वाच्या पर्यटन स्थळांपैकी एक असणाऱ्या चिखलदरा येथे देखील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे. मंगळवारी अमरावती जिल्ह्यात 81 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली, त्यापैकी चिखलदरा येथे दोन कोरोना रुग्ण आहेत.
चिखलदरा येथील सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत 27 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. चिखलदरा शेजारील रहिवासी असणाऱ्या 65 वर्षाच्या पुरुषालाही कोरोनाची लागण झाली आहे. मोर्शी शहरात पुनर्वसन कॉलनी परिसरात राहणाऱ्या 29 वर्षी0य पुरुष आणि 25 वर्षाीय महिलेलाही कोरोना झाला आहे. तसेच मोर्शी तालुक्यात येणाऱ्या नेर पिंगळाई येथील 50 वर्षीय महिलेला कोरोना झाला आहे.
हेही वाचा - राज्यात आज आठ हजार नव्या रुग्णांसह २४६ मृत्यूंची नोंद; तर सात हजार रुग्णांना डिस्चार्ज..
अंजनगाव तालुक्यात विहिगाव येथील 20 वर्षीय युवकही कोरोनाबधित आहे. भातकुली तालुक्यात येणाऱ्या पूर्णानगर येथे दोन महिलांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच परतवाडा शहरात एक कोरोनाग्रस्त आढळला आहे. यावली शाहिद गावात तिघांना कोरोनाची लागण झाली आहे.
अमरावती शहर सध्या कोरोनाच्या विळख्यात आहे. मंगळवारी शहरातील नमुना, इतवरा, ताजनागर, देशमुख लॉन परिसर, सिद्धार्थ नगर, हनुमान नगर, भाजीबाजार, अलीम नगर, पर्वतीनगर, विजय नगर, जुनी वस्ती बडनेरा, अंबापेठ, झमझम लॉन, तारखेडा, गोपाल नगर, सोनल कॉलनी, अंबापेठ, रामपुरी कॅम्प, सोनल कॉलनी, सिंधू नगर या भागात कोरोनारुग्ण आढळलेत. अमरावती जिल्ह्यात कोरोनामुळे 42 जण दगावले आहेत. 460 रुग्णांनावर अमरावतीत उपचार सुरू आहेत तर 16 जणांना उचारासाठी नागपूरला पाठवण्यात आले आहे.