मुंबई: सकाळच्या सत्रात मुंबई शेअर बाजारात जोरदार तेजी दिसून आले. अमेरिकेच्या सीपीआय चलनवाढीच्या आकडेवारीनंतर जागतिक बाजारात तेजी दिसून आली. त्यानंतर मुंबई शेअर बाजारासह निफ्टीने आजवरचा सर्वात विक्रमी निर्देशांक नोंदविला आहे.
सॉफ्टवेअरमधील बलाढ्य कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये खरेदी केल्याने शेअर बाजारात सकारात्मक चित्र आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सकाळच्या सत्रात 391.48 अंशांनी वाढून 65,785.38 वर पोहोचला. एनएसई निफ्टीचा निर्देशांक 111.3 अंकांनी वाढून 19,495.60 वर पोहोचला. त्यानंतरच्या काही वेळेत मुंबई शेअर बाजाराने 65,943.57 चा निर्देशांक गाठला. निफ्टीने 19,540.25 हा निर्देशांक गाठला. दोन्ही शेअर बाजाराने आजपर्यंतचे सर्वोच्च निर्देशांक नोंदविले आहेत
या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर- टाटा स्टील, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, महिंद्रा अँड महिंद्रा, इन्फोसिस, जेएसडब्ल्यू स्टील, कोटक महिंद्रा बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एचडीएफसी बँक या कंपन्यांचे टीसीएसने जून तिमाहीची कमाई जाहीर केल्यानंतर शेअर बाजारात सकारात्मक चित्र आहे. देशातील सर्वात मोठ्या आयटी सेवा कंपनीने बुधवारी जून तिमाहीत निव्वळ नफ्यात 16.83 टक्क्यांची वाढ नोंदविली आहे. टीसीएसने 11,074 कोटी रुपयांचा नफा नोंदविला. पॉवर ग्रिड, एचसीएल टेक्नॉलॉजीज, एशियन पेंट्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, मारुती आणि नेस्ले या कंनपीचे शेअर घसरले आहेत.
अशी आहे जागतिक बाजारातील स्थिती- ग्राहक किंमत निर्देशांकवर (CPI) आधारित किरकोळ चलनवाढ सलग चार महिने घसरल्यानंतर जूनमध्ये 4.81 टक्क्यांपर्यंत वाढली. भाजीपाला आणि दुधाच्या किमती वाढल्या आहेत. जागतिक कच्च्या तेलाच्या बाजारात ब्रेंट क्रूडच्या किमती 0.45 टक्क्यांनी वाढून 80.47 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहे. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी 1,242.44 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली आहे. बुधवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 223.94 अंशांनी घसरून 65,393.90 वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक दिवसाखेर 55.10 अंशांनी घसरून 19,384.30 वर निर्देशांक स्थिरावला.
हेही वाचा-