ETV Bharat / business

Policybazaar IT system hack : पॉलिसीबझारची आयटी प्रणाली झाली हॅक; ग्राहकांचा डेटा सुरक्षित असल्याचा कंपनीचा दावा - पॉलिसीबझार एक विमा ब्रोकरेज

पीबी फिनटेकची आयटी प्रणाली ( Policybazaar IT system hacked ) 19 जुलै रोजी हॅक झाली होती, त्यानंतर ती दुरुस्त करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. विमा कंपनीने सांगितले की, घटनेचा सखोल आढावा घेतला जात असून, यादरम्यान ग्राहकांचा डेटा सुरक्षित असल्याचे आढळून आले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की पीबी फिनटेकही पॉलिसीबझार इन्शुरन्स ब्रोकर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीची कंपनी आहे.

Policybazaar
पॉलिसीबझार
author img

By

Published : Jul 25, 2022, 12:37 PM IST

नवी दिल्ली: पॉलिसीबझार इन्शुरन्स ब्रोकर्स प्रायव्हेट लिमिटेडची ( Policybazar Insurance Brokers Private Limited ) मालकी असलेल्या पीबी फिनटेकने रविवारी सांगितले की, कंपनीची आयटी प्रणाली 19 जुलै रोजी हॅक झाली ( Policybazaar IT system hacked ) होती. त्यानंतर त्याचे निराकरण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या. कंपनीला 19 जुलै रोजी पॉलिसीबझार इन्शुरन्स ब्रोकर्स आयटी प्रणालीमध्ये काही त्रुटी आढळल्या होत्या, जी नेटवर्कमध्ये अनधिकृत घुसखोरी होती.

नियामक दस्तऐवजात, विमा कंपनीने म्हटले आहे की, "या संदर्भात पॉलिसीबाझारने संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे आणि कायद्यानुसार कारवाई केली जात आहे. त्रुटी दुरुस्त करण्यात आल्या आहेत आणि सिस्टमची कसून चौकशी केली जात आहे." त्यात असेही म्हटले आहे की, "तथापि, आम्ही तपशीलवार पुनरावलोकन करण्याच्या प्रक्रियेत आहोत. दरम्यान, या हॅकिंगमुळे ग्राहकांचा कोणताही गंभीर डेटा लीक झाला ( Customer data not leaked due to hacking ) नसल्याचे पुनरावलोकनात आढळून आले आहे. पॉलिसीबझारने नेहमीच आपल्या सिस्टमची सुरक्षा आणि अखंडतेला प्राधान्य दिले आहे." आणि गंभीर ग्राहक डेटाचे संरक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे."

माहिती सुरक्षा पथक सध्या बाह्य सल्लागारांसह प्रकरणाचा आढावा घेत आहे. पॉलिसीबझार एक विमा ब्रोकरेज ( Policybazaar an insurance brokerage ) आहे आणि पॉलिसीधारकांबद्दल त्यांच्या व्यवहार तपशीलांसह भरपूर डेटा संग्रहित करते.

हेही वाचा - Stock Market Fell : शेअर बाजार 225 अंकांनी कोसळला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.