ETV Bharat / business

Indian Stock Market Update सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 155 अंकांनी घसरला तर निफ्टी 17,600 वर आला - भारतीय शेअर बाजार

जागतिक बाजारातील संमिश्र कल आणि टीसीएस इन्फोसिस आणि मारुती यांसारख्या मोठ्या समभागांच्या घसरणीमुळे शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 155 अंकांनी घसरला Sensex fell by 155 points

Indian Stock Market
Indian Stock Market
author img

By

Published : Aug 12, 2022, 2:59 PM IST

Updated : Aug 13, 2022, 12:22 PM IST

मुंबई: जागतिक बाजारातील संमिश्र कल Mixed trends in global markets आणि टीसीएस इन्फोसिस आणि मारुती यांसारख्या मोठ्या समभागांच्या घसरणीमुळे शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 155 अंकांनी घसरला. BSE 30 शेअर निर्देशांक सुरुवातीच्या व्यवहारात 155.21 अंक किंवा 0.26 टक्क्यांनी घसरून 59,177.39 वर आला. त्याचप्रमाणे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 37.25 अंकांनी किंवा 0.21 टक्क्यांनी घसरून 17,621.75 अंकांवर आला. सेन्सेक्स कंपन्यांमध्ये सर्वात जास्त 1.34 टक्क्यांची घसरण टेक महिंद्रात झाली. याशिवाय नेस्ले इंडिया, मारुती, इन्फोसिस, अल्ट्राटेक सिमेंट, टीसीएस आणि सन फार्मा हेही सुरुवातीच्या व्यवहारात तोट्यात होते.

दुसरीकडे, टाटा स्टील, पॉवर ग्रिड, एसबीआय, एनटीपीसी, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक आणि टायटन या शेअर्समध्ये वाढ झाली. मागील सत्रात शुक्रवारी बीएसई 30 शेअर्सचा सेन्सेक्स 515.31अंकांनी म्हणजेच 0.88 टक्क्यांनी वाढून 59,332.60 वर बंद झाला. तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 0.71 टक्क्यांनी 124.25 अंकांनी वधारून 17,659 अंकांवर बंद झाला. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड 0.40 टक्क्यांनी घसरून 99.20 डॉलर प्रति बॅरलवर आले. उपलब्ध आकडेवारीनुसार, गुरुवारी विदेशी गुंतवणूकदारांनी 2,298.08 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.

हेही वाचा - अटल पेन्शन योजनेत सुधारणा, आयकर भरणारे APY साठी ठरणार अपात्र

Last Updated : Aug 13, 2022, 12:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.