नवी दिल्ली : नोटाबंदी आणि डिजिटल व्यवहारांमुळे लोकांच्या सवयींमध्ये बदल झाला आहे. लोक आता रोख रकमेऐवजी ऑनलाइन पेमेंट करण्यास प्राधान्य देत आहेत. डिजिटल व्यवहारांमुळे, आता बहुतेक लोक त्यांच्या घरात रोख ठेवण्याच्या सवयीला आळा घालत आहेत. परंतु असे असूनही, अनेक लोक आपत्कालीन वापरासाठी घरी रोख रक्कम ठेवतात. घरी रोख ठेवणाऱ्यांपैकी तुम्ही एक आहात का? जरी घरी रोख रक्कम ठेवणे गुन्हा नसले तरी यासाठीही आयकराचे काही नियम आहेत की, तुम्ही घरात किती रोकड ठेवू शकता.
जाहीर करावा लागतो उत्पन्नाचा स्रोत: आयकर कायद्यानुसार घरात रोख रक्कम ठेवण्यावर कोणतेही बंधन नाही. पण आयकर विभागाने छापे टाकल्यास त्या व्यक्तीला उत्पन्नाचा स्रोत जाहीर करावा लागतो. त्या उत्पन्नाशी संबंधित सर्व कागदपत्रे विभागाच्या अधिकाऱ्याला दाखवावी लागतात. विशेषतः जेव्हा मालमत्ता उत्पन्नापेक्षा जास्त असते. जर तुमच्या घरात ठेवलेल्या रकमेची कागदपत्रे तुमच्या मालमत्तेशी जुळत नसतील तर आयकर अधिकारी तुमच्यावर दंड ठोठावू शकतात. तुमच्याकडून वसूल केलेल्या रोख रकमेच्या 137% पर्यंत कर लावला जाऊ शकतो. याचा अर्थ असा की, तुमच्याकडे ठेवलेल्या रोख रकमेच्या 37 टक्के रक्कम ही मालमत्तेएव्हडी असेल तर तुम्हाला दंड भरावा लागेल.
रोख ठेवण्याबाबत प्राप्तिकर विभागाचे नियम: आयकर विभागाच्या नियमांनुसार, कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही कर्जासाठी किंवा ठेवीसाठी 20 हजार रुपये किंवा त्याहून अधिक रोख घेण्याची परवानगी नाही. याशिवाय नातेवाईकांकडून एका दिवसात सुमारे 2 लाख रुपयांची रोख रक्कम घेता येणार नाही. हे पेमेंट बँकेमार्फत केले जावे, याची जाणीव असणे आवश्यक आहे. त्याच वेळी, 50,000 रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम जमा करण्यासाठी किंवा काढण्यासाठी पॅन कार्ड दाखवणे बंधनकारक असेल.
..तर दाखवावे लागते पॅन आणि आधार: खरेदी करताना 2,00,000 पेक्षा जास्त रक्कम रोखीने भरता येत नाही. यापेक्षा जास्त रोख रक्कम जवळ बाळगण्यासाठी तुम्हाला पॅन आणि आधार कार्ड देखील दाखवावे लागेल. या सर्वांशिवाय, तुम्ही एका वर्षात बँक खात्यात 20 लाख रुपयांपेक्षा जास्त रोख जमा केले तरीही तुम्हाला तुमचे पॅन आणि आधार कार्ड दाखवावे लागेल.
हेही वाचा: पंतप्रधान मोदी हे तर भित्रे, प्रियांका गांधी आक्रमक