मुंबई BSE Sensex Today - शेअर बाजारात आज उत्साहाची लाट दिसून येत आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर 417 अंकांनी वाढून 67,016 अंकांवर स्थिरावला. दुसरीकडे सार्वजनिक कंपन्यांच्या शेअरची गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केली. त्यामुळे सार्वजनिक कंपन्यांच्या शेअर विक्रीत मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं.
पॉवरग्रीडमुळे सेन्सेक्स सुमारे 2 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. तर आयटीआय 20 टक्क्यांनी, इरकॉन 19 टक्क्यांपेक्षा जास्त, एसजेव्हीएन 19 टक्क्यांनी, आरव्हीएनएल कंपन्यांचे शेअर 15 टक्क्यांनी वधारले होते. सोनम श्रीवास्तव, स्मॉलकेस मॅनेजर आणि राइट रिसर्चचे संस्थापक म्हणाल्या की, निफ्टीनं 20 हजारापर्यंतचा टप्पा गाठणं ही एक उत्साहवर्धक बाब आहे. त्यामुळे विदेशी गुंतवणूक वाढण्यास प्रोत्साहन मिळणार आहे. आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील प्रगती आणि रिलायन्स इंडस्ट्रीज सारख्या प्रमुख कंपन्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे शेअर बाजारात तेजी निर्माण झालीय.
-
#WATCH | Mumbai, Maharashtra | Celebrations at National Stock Exchange (NSE) as Nifty50 touches 20,000 mark for the first-time ever. pic.twitter.com/bWacsEQOEf
— ANI (@ANI) September 11, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | Mumbai, Maharashtra | Celebrations at National Stock Exchange (NSE) as Nifty50 touches 20,000 mark for the first-time ever. pic.twitter.com/bWacsEQOEf
— ANI (@ANI) September 11, 2023#WATCH | Mumbai, Maharashtra | Celebrations at National Stock Exchange (NSE) as Nifty50 touches 20,000 mark for the first-time ever. pic.twitter.com/bWacsEQOEf
— ANI (@ANI) September 11, 2023
या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर- मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 528.17 अंकांनी 67,127.08 वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक 573.22 अंकांनी वधारून 67,172.13 वर पोहोचला. निफ्टीचा निर्देशांक 188.2 अंकांनी वधारून 20,008.15 पोहोचला होता. हा निफ्टीचा आजपर्यंतचा सर्वोच्च निर्देशांक आहे. एचडीएफसी सिक्युरिटीज लिमिटेडचे एमडी आणि सीईओ धीरज रेल्ली म्हणाले, अलीकडेच चंद्रयान आणि जी २० परिषदेत मुत्सद्देगिरीमध्ये भारतानं यशस्वी कामगिरी केलीय. त्यामुळे जगभरात भारतीय शेअर बाजाराची मागणी वाढलीय. दुसरीकडं जागतिक बाजारातही स्थिरता आहे.मुंबई शेअर बाजारात अॅक्सिस बँक, पॉवर ग्रिड, मारुती, स्टेट बँक ऑफ इंडिया, टाटा मोटर्स, आयटीसी, नेस्ले आणि महिंद्रा अँड महिंद्रा या कंपन्यांचे शेअर वधारले. मात्र, बजाज फायनान्स आणि लार्सन अँड टुब्रोचे शेअर घसरले आहेत.
अशी आहे बाजाराची स्थिती- डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य 1 पैशांनी घसरून 83.03 वर स्थिरावले. आज सोन्याचा भाव 50 रुपयांनी घसरून 60,000 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला, असे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटलं आहे. मागील सोन्याचा दर 60,050 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. चांदीचा दर प्रति किलो 500 रुपयांनी वाढून 74,400 रुपये आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजचे कमोडिटीजचे वरिष्ठ विश्लेषक सौमिल गांधी म्हणाले, रुपयाच्या अस्थिरतेमुळे देशांतर्गत बाजारातील सोन्याच्या किमती अस्थिर आहेत.
हेही वाचा-