मुंबई - नॅशनल स्टॉक एक्सचेंजने (एनएसई) बुधवारी झालेल्या तांत्रिक त्रुटीबाबत स्पष्टीकरण दिले आहे. ऑनलाईन जोखीम व्यवस्थापन व्यवस्था नसल्याने चार तास ट्रेडिंग दर्शविण्याचे बंद राहिल्याचे एनएसईने म्हटले आहे.
एनएसईमध्ये ट्रेडिंग दाखविण्यासाठी विविध दूरसंचार कंपन्यांकडून लिंक देण्यात येतात. त्यापैकी दोन दूरसंचार कंपन्यांनी बुधवारी त्यांच्या सर्व लिंक अस्थिर असल्याची माहिती एनएसईला दिली होती. त्याचा ऑनलाईन जोखीम व्यवस्थापन व्यवस्थेवर परिणाम झाला. मात्र, त्याचा ट्रेडिंगवर परिणाम झाला नसल्याचे एनएसईने स्पष्ट केले आहे. दूरसंचार सेवा पुरवठादाराकडून झालेल्या समस्येचे मूळ शोधण्याचे काम सुरू असल्याचे एनएसईने म्हटले आहे.
हेही वाचा-सोन्याच्या दरात ३५८ रुपयांची घसरण; चांदी १५१ रुपयांनी महाग
काय झाले होते बुधवारी?
शेअर बाजाराची आकडेवारी आणि माहिती व्यावसायिक आणि गुंतवणुकदारांना दाखविण्यासाठी राष्ट्रीय शेअर बाजाराकडून टेलिकॉम कंपन्यांची सेवा घेतली जाते. या सेवेच्या लिंकमध्ये तांत्रिक अडचण आली आहे. त्यामुळे एनएसई अपडेट होणे थांबले होते. एनएसईने ट्विटरद्वारे याबाबत अधिकृत माहिती दिली होती.
हेही वाचा-हळदीला सोन्याची चकाकी; मिळाला दहा वर्षातील उच्चांकी दर
दरम्यान, नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये (एनएसई) तांत्रिक अडथळ्यामुळे चार तास व्यवहार ठप्प झाले होते. या प्रकाराची सेबीने माहिती मागविली आहे. सेबीने लवकरात लवकर अहवाल पाठविण्याचे एनएसईला निर्देश दिले आहेत.