ETV Bharat / business

LIC IPO : रशिया-युक्रेन युद्धामुळे एलआयसी आयपीओ पुढे ढकलू शकते सरकार - रशिया-युक्रेन युद्धाचा भारतावर परिणाम

रशियन-युक्रेन युद्धाचा ( Russia Ukraine War ) जागतिक वित्तीय बाजारांवर परिणाम झाल्यामुळे, सरकार LIC चा मेगा IPO पुढे ढकलू शकते. विमा कंपनीतील आपल्या स्टेकचे जास्तीत जास्त मूल्य मिळविण्यासाठी सरकार योग्य वेळेची वाट पाहू शकते. या महिन्यात आयपीओ बाजारात येण्याची अपेक्षा होती.

LIC IPO
एलआयसी आयपीओ
author img

By

Published : Mar 3, 2022, 11:26 AM IST

नवी दिल्ली - रशियाने युक्रेनविरोधात युद्ध ( Russia Ukraine War ) पुकारलं आहे. याचे पदसाद संपूर्ण जगावर पडत असल्याचे दिसून येत आहे. या युद्धाचा परिणाम आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) समभाग विक्री ( LIC IPO ) म्हणजे आयपीओपवर पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. रशियन-युक्रेन युद्धाचा जागतिक वित्तीय बाजारांवर परिणाम झाल्यामुळे, सरकार LIC चा मेगा IPO पुढे ढकलू शकते. विमा कंपनीतील आपल्या स्टेकचे जास्तीत जास्त मूल्य मिळविण्यासाठी सरकार योग्य वेळेची वाट पाहू शकते. या महिन्यात आयपीओ बाजारात येण्याची अपेक्षा होती.

रशिया-युक्रेन युद्ध सुरूच आहे. चालू आर्थिक वर्षात 78,000 कोटी रुपयांचे निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जीवन विमा कंपनीतील 5 टक्के हिस्सा विकून 63,000 कोटी रुपये उभारण्याची सरकारची अपेक्षा होती. या आर्थिक वर्षात आतापर्यंत, सरकारने CPSEs च्या निर्गुंतवणुकीतून आणि एअर इंडियाच्या धोरणात्मक विक्रीद्वारे 12,030 कोटी रुपये उभे केले आहेत.

LIC मध्ये सरकारचे 100 टक्के स्टेक किंवा 632.49 कोटी पेक्षा जास्त शेअर्स आहेत. शेअर्सचे दर्शनी मूल्य 10 रुपये प्रति शेअर आहे. LIC पब्लिक इश्यू हा भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठा IPO असेल. शेअर बाजारात सूचिबद्ध झाल्यावर एलआयसी सर्वाधिक बाजारभांडवल असलेली देशातील तिसरी सर्वात मोठी कंपनी ठरण्याची शक्यता आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टीसीएसनंतर ती तिसरी सर्वात मोठी कंपनी असेल.

काय आहे आयपीओ?

पैसे जमविण्यासाठी कंपन्या आयपीओ म्हणजेच प्राथमिक समभाग विक्री (इनिशिअल पब्लिक ऑफरिंग) शेअर बाजारात आणत असतात. आयपीओच्या माध्यमातून कंपन्या गुंतवणूकदार संस्थांना तसेच सर्वसामान्य गुंतवणुकादारांना शेअर खऱेदीची संधी देतात. आयपीओ बाजारात आणण्यापूर्वी कंपन्यांना सेबीची परवानगी घ्यावी लागते. आयपीओ म्हणजे थोडक्यात शेअर बाजारात सूचिबद्ध होण्यापूर्वी कंपनीने शेअरची जाहीर केलेली किमान किंमत असते.

हेही वाचा - LIC IPO: एलआयसी आयपीओ मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी 'हे' वाचा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.