नवी दिल्ली - आज सकाळी शेअर बाजार उघडताच शेअर बाजाराचा निर्देशांक तब्बल १४ हजार अंशांनी कोसळला. तर, निफ्टीही ११ हजारांच्या खाली उघडला. २०२० वर्षातील आतापर्यंतच्या सर्वांत कमी अंशांवर आज बाजार उघडला. येस बँकेचे शेअर्स १५ टक्क्यांनी घसरले.
सकाळी 9 वाजून 16 मिनिटांनी सेंसेक्स 1,281.85 अंशांनी किंवा 3.33% घसरून 37188.76 वर तर, निफ्टी 386.30 अंशांनी किंवा 3.43% घसरून 10882.70 वर पोहोचला.
डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला
भारतीय शेअर बाजारात घसरण होण्याबरोबरच रुपयाचे अवमूल्यन झाले आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया 65 पैशांनी घसरला आहे. आता एका डॉलरसाठी 73.99 रुपये मोजावे लागणार आहेत.