मुंबई - जम्मू व काश्मीरचे ३७० कलम रद्द केल्यानंतर सोमवारी शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती. शेअर बाजार निर्देशांक सकाळच्या सत्रात आज सावरून २०८ अंशाने वधारला आहे.
शेअर बाजार निर्देशांक २०८ अंशाने वधारून ३६,९०८.७१ वर पोहोचला. निफ्टीच्या निर्देशांकही ५० अंशाने वधारून १०,९१२.१५ वर पोहोचला.
सोमवारी शेअर बाजाराचा निर्देशांक ४१८ अंशाची पडझड-
सोमवारी शेअर बाजाराचा निर्देशांक ४१८ अंशाने घसरला होता. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी सोमवारी २ हजार १६.७३ कोटींच्या शेअरची विक्री केली. डॉलरच्या तुलनेत ९० पैशांनी घसरण होवून सोमवारी दुपारनंतर रुपया ७०.५० वर पोहोचला.