मुंबई - गेली दोन दिवस विक्रमी उसळी घेतलेल्या शेअर बाजार निर्देशांकात सकाळच्या सत्रात ३०० अंशाची घसरण झाली. बँकिंग, आयटी आणि ऑटो कंपन्यांच्या शेअरमधील घसरण आणि विदेशी गुंतवणुकदारांनी निधी काढून घेतल्याने शेअर बाजारात घसरण झाली आहे.
शेअर बाजारात मंगळवारी ७.११ अंशाची अल्प घसरण होवून निर्देशांक ३९,०९७ वर पोहोचला होता. तर निफ्टीचा निर्देशांक हा १२ अंशाने घसरून ११,५८८.२० वर पोहोचला होता.
हेही वाचा-कांदे भाववाढ: व्यापाऱ्यांकडील साठ्यावर मर्यादा घालण्याचा केंद्र सरकारचा विचार
या कंपन्यांचे शेअर घसरले-वधारले
टाटा मोटर्स, एसबीआय, एचडीएफसी ट्विन्स, वेदांत, टाटा स्टील, कोटक बँक, अॅक्सिस बँक, मारुती, इन्फोसिस, आयटीसी आणि आयसीआयसी बँकेचे शेअर ३ टक्क्यांनी घसरले. तर पॉवरग्रीड, रिलायन्स इंडस्ट्रीज, एनटीपीसी, टीसीएस, एचसीएल टेक, टेक महिंद्रा आणि भारती एअरटेलचे शेअर २ टक्क्यांनी वधारले.
हेही वाचा-केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाचा परिणाम झाल्याने पीएमसीचे संकट
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला व्यापार युद्धावरून इशारा दिला आहे. तसेच हाँगकाँगमधील लोकशाहीचे संरक्षण करण्यास सांगितले आहे. त्यामुळे जागतिक आर्थिक मंचावर गुंतवणुकदार चिंतित झाले आहेत.
हेही वाचा-सणाच्या मोठ्या सेलकरिता फ्लिपकार्टची लगबग; ५० हजार जणांना देणार थेट रोजगार