मुंबई - शेअर बाजार निर्देशांक ६२२ अंशांनी वधारून ३०,८१८.६१ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक १८७.४५ अंशांनी वधारून ९,०६६.५५वर स्थिरावला. एचडीएफसीचे सर्वाधिक ५ टक्क्यांनी शेअर वधारले.
एम अँड एम, एल अँड टी, टाटा स्टील, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक आणि सन फार्माचे शेअर वधारले आहेत. दुसरीकडे इंडसइंड बँक, हिरो मोटोकॉर्प, भारती एअरटेल आणि एशियन पेंट्सचे शेअर घसरले आहेत.
हेही वाचा-उबेरपाठोपाठ ओलाचीही कर्मचारी कपात; १,४०० जणांच्या नोकरीवर गदा
देशातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने शेअर बाजारात अस्थिरता असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. रुपया डॉलरच्या तुलने १४ पैशांनी घसरला आहे. त्यामुळे एका डॉलररसाठी ७५.८० रुपये मोजावे लागणार आहेत.
हेही वाचा-जागतिक अनिश्चिततेने सोने पुन्हा महागले; जाणून घ्या आजचा दर