मुंबई - शेअर बाजार निर्देशांक १७२ अंशाने वधारून ४०,४१२ वर स्थिरावला. ऑटो कंपन्या, आयटी कंपन्या, कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू कंपन्यांचे शेअर वधारले. कच्च्या तेलाचे दर कमी झाल्याने शेअर बाजार निर्देशांक वधारण्यास मदत झाली.
शेअर बाजार निर्देशांक १७२.६९ अंशाने वधारून ४०,४१२.५७ वर स्थिरावला. निफ्टीचा निर्देशांक ५३.३५ अंशाने घसरून ११,९१०.१५ वर स्थिरावला.
या कंपन्यांचे शेअर घसरले-वधारले
एनटीपीसीचे शेअर हे २.७७ टक्क्यांनी वधारले. त्यापाठोपाठ ओएनजीसी, टेक महिंद्रा, कोटक बँक, टीसीएस, एशियन पेंट्स, इंडुसइंड बँक आणि टाटा मोटर्सचे शेअर हे २.२८ टक्क्यांनी वधारले. येस बँकेचे शेअर सलग दुसऱ्या सत्रात १५.३३ टक्क्यांनी घसरले. वेदांत, हिरो मोटोकॉर्प, एल अँड टी, भारती एअरटेल आणि एचयूएलचे शेअर १.६३ टक्क्यापर्यंत घसरले.
हेही वाचा-चालू आर्थिक वर्षात देशाचा जीडीपी ५.१ टक्के राहिल; एडीबी बँकेचा अंदाज
विकास दर घटण्याचा अंदाज-
एशियन डेव्हलपमेंट बँकेने (एडीबी) चालू आर्थिक वर्षात जीडीपीचा विकासदर हा ५.१ टक्के राहील, असा अंदाज व्यक्त केला. यापूर्वी एडीबीने सप्टेंबरमध्ये देशाचा विकासदर हा ६.५ टक्के राहील, असा अंदाज व्यक्त केला होता.
हेही वाचा-वैयक्तिक माहिती संरक्षण विधेयक लोकसभेत होणार दाखल : जाणून घ्या, काय आहेत तरतुदी