ETV Bharat / business

मुंबई शेअर बाजाराने ओलांडला पुन्हा ५०,००० चा टप्पा! - share market today

मुंबई शेअर बाजारापाठोपाठ निफ्टीचा निर्देशांक वधारला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर १८४.९५ अंशांने वधारून १५,१०८.१० वर स्थिरावला.

Sensex
मुंबई शेअर बाजार
author img

By

Published : May 18, 2021, 4:41 PM IST

मुंबई - मुंबई शेअर बाजाराने ५०,००० चा टप्पा ओलांडला आहे. शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ६१२.६० अंशांने वधारून ५०,१९३.३३ वर स्थिरावला. जागतिक बाजारात सकारात्मक स्थिती असताना एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि बजाज फायनान्सचे शेअर वधारले आहेत.

मुंबई शेअर बाजारापाठोपाठ निफ्टीचा निर्देशांक वधारला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर १८४.९५ अंशांने वधारून १५,१०८.१० वर स्थिरावला.

हेही वाचा-कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू झाल्यास 'ही' कंपनी कुटुंबाला १ कोटीपर्यंत करणार मदत

या कंपन्यांचे वधारले-घसरले निर्देशांक

एम अँड एमचे सर्वाधिक सुमारे ६ टक्क्यांनी शेअर वधारले. त्यापाठोपाठ बजाज ऑटो, टायटन, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक आणि पॉवरग्रीडचे शेअर वधारले आहेत. तर भारती एअरटेल, आयटीसी, डॉ. रेड्डीज आणि एसबीआयचे शेअर घसरले आहेत.

हेही वाचा-एलॉन मस्क असल्याचे भासवित क्रिप्टोकरन्सीमध्ये २ दशलक्ष डॉलरची फसवणूक

शेअर बाजारात सकारात्मक चित्र-

दैनंदिन आढळणाऱ्या कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी झाल्यानंतर शेअर बाजाराचा निर्देशांक वधारत आहेत. देशाची अर्थव्यवस्था वेगाने सुधारेल, अशी गुंतवणुकदारांना अपेक्षा असल्याचे रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुख्य रणनीतीतज्ज्ञ विनोद मोदी यांनी सांगितले. आशियामधील बहुतांश शेअर बाजार वधारल्याचेही मोदी यांनी नमूद केले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर ०.८२ टक्क्यांनी वधारून प्रति बॅरल ७०.०३ डॉलर आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.