मुंबई - शेअर बाजार खुला होताना निर्देशांक १,१०० अंशांनी वधारला. एचडीएफसी ट्विन्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक आणि टीसीएसचे शेअर वधारले आहेत.
भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास हे आज पत्रकार परिषद घेणार असल्याने गुंतवणूकदारांनी शेअर खरेदीला सकारात्मक प्रतिसाद दिला.
हेही वाचा-टाटाकडून मोलाची मदत; १५० कोटींच्या वैद्यकीय साहित्याचा पुरवठा
मुंबई शेअर बाजार १,०३६.७४ अंशांनी वधारून ३१,७११.७० वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक २९१ अंशांनी वधारून ९,२८३.८० वर पोहोचला. सर्वाधिक टीसीएसचे ७ टक्क्यांनी शेअर वधारले आहेत. मार्चच्या तिमाहीत टीसीएसच्या उत्पन्नात ५.१ टक्के वाढ झाली आहे. अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, पॉवरग्रीड आणि इंडसइंड बँकेचे शेअर वधारले आहेत.
हेही वाचा-बँकांना मोठा दिलासा; एलसीआरचे प्रमाण १०० टक्क्यांवरून ८० टक्के करण्याचा निर्णय