मुंबई - शेअर बाजार खुला होताना निर्देशांक ८०० अंशांनी घसरला आहे. आर्थिक पॅकेजची घोषणा होवूनही देशातील गुंतवणूकदारांचा विश्वास वाढू शकला नाही. त्यामुळे बँकिंगच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे.
मुंबई शेअर बाजार निर्देशांक ७३१.९१ अंशांनी घसरून ३०,२६५.६७ वर पोहोचला आहे. तर निफ्टीचा निर्देशांक २२६.९० अंशांनी घसरून ८,९०९.९५ वर पोहोचला. आयसीआयसीआय बँकेचे सर्वाधिक ६ टक्क्यांनी शेअर घसरले आहेत. त्यापाठोपाठ अॅक्सिस बँक, एसबीआय, बजाज फायनान्स, टायटन, मारुती, इंडुसइंड बँक, पॉवरग्रीड आणि ओएनजीसीचे शेअर घसरले आहेत. तर इन्फोसिस आणि टीसीएसचे शेअर वधारले आहेत.
हेही वाचा-टाळेबंदीतही भरारी; जनरल अटलांटिकची जिओत ६५९८.३८ कोटींची गुंतवणूक
मागील सत्रात मुंबई शेअर बाजार निर्देशांक २५.१६ अंशांनी घसरून ३१,०९७.७३ वर स्थिरावला होता. तर निफ्टीचा निर्देशांक ५.९० अंशांनी घसरून ९,१३६.८५ वर स्थिरावला होता.
हेही वाचा-'केंद्र सरकारची किरकोळ विक्रेत्यांना सावत्र आईसारखी वागणूक'
दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सुमारे २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज पाच टप्प्यात जाहीर केले आहे.