ETV Bharat / business

Omicron Impact on BSE : ओमायक्रॉनचा धसका; शेअर बाजारात 949 अंशांची पडझड

शेअर बाजार विश्लेषकांच्या माहितीनुसार, आठवडाखेर ओमायक्रोनचा संसर्ग वाढत असल्याने शेअर बाजारात घसरण झाली ( Omicron Impact on BSE ) आहे. दिवसाखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 949.32 अंशाने घसरून ( Sensex drops 949 points ) 56,747.14 वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक 284.45 घसरून 16,912.25 वर स्थिरावला.

शेअर बाजारात 949 अंशांची पडझड
शेअर बाजारात 949 अंशांची पडझड
author img

By

Published : Dec 6, 2021, 5:28 PM IST

Updated : Dec 6, 2021, 6:00 PM IST

मुंबई - शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर 949 अंशाने कोसळला आहे. देशात ओमायक्रॉनचा संसर्ग वाढण्याची भीतीने सर्वच क्षेत्रांमधील कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे.

शेअर बाजार विश्लेषकांच्या माहितीनुसार, आठवडाखेर ओमायक्रोनचा संसर्ग वाढत असल्याने शेअर बाजारात घसरण ( Sensex nosedives ) झाली आहे. दिवसाखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 949.32 अंशाने घसरून ( Sensex drops 949 points ) 56,747.14 वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक 284.45 घसरून 16,912.25 वर ( Nifty tanks below 16950 ) स्थिरावला.

हेही वाचा-Wasim Rizvi Accept Sanatan Dharma : वसीम झाले आता जितेंद्र, रिजवींनी घेतला सनातन धर्मात प्रवेश

या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर

मुंबई शेअर बाजारात इंडसइंडचे सर्वाधिक 4 टक्क्यांनी शेअर घसरले आहेत. त्यापाठोपाठ बजाज फिनसर्व्ह, भारती एअरटेल, टीसीएस, एचसीएल टेक आणि टेक महिंद्राचे शेअर घसरले आहेत.

हेही वाचा-President Ram Nath Kovind at Raigad : राष्ट्रपती रामनाथ कोविंद याचे किल्ले रायगडावर आगमन

अशी आहे बाजारातील स्थिती-

एलकेपी सिक्युरिटीजचे संशोधक प्रमुख म्हणाले, की दुपारनंतर सर्वच क्षेत्रांतील कंपन्यांच्या शेअरची विक्री वाढली. त्यामुळे दिवसाखेर शेअर बाजार निर्देशांकात घसरण झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून त्रैमासिक पतधोरण बुधवारी जाहीर केले जाणार आहे. त्याकडे शेअर बाजार गुंतवणूकदारांचे लक्ष लागलेले आहे. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी ( FII ) मोठ्या प्रमाणात शेअरची विक्री केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्चा तेलाचे दर 2.23 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल 71.44 डॉलरवर पोहोचले आहेत.

हेही वाचा-Woman Suicide for blouse : पतीने आवडीनुसार ब्लाउज न शिवल्याने पत्नीची आत्महत्या

राज्यात 8 जणांना ओमायक्रॉनची लागण

दक्षिण आफ्रिका खंडामध्ये डेल्टचा संसर्ग जाऊन त्याची जागा आता 'ओमायक्रॉन'ने (Omicron variant in Maharashtra ) घेतली आहे. हा संसर्ग भारतातही आला असून राज्यात 8 जणांना ओमायक्रॉनची लागण झाली असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपेय यांनी दिली आहे. या संसर्गाचा वेग प्रचंड असून यापुढे देखील सर्वांनी काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope on Omicron Variant ) यांनी म्हटले आहे.

Last Updated : Dec 6, 2021, 6:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.