मुंबई - शेअर बाजाराने आजपर्यंतचा विक्रम नोंदवून ४२,६४५.३३ चा आज टप्पा गाठला होता. दिवसाखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ७०४.३७ अंशाने वधारून ४२,५९७.४३ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक १९७.५० अंशाने वधारून १२,४६१.०५ वर स्थिरावला.
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर शेअर बाजारात सकारात्मक पडसाद उमटल्याचे आनंद राठीचे मुख्य शेअर संशोधक नरेंद्र सोळंकी यांनी सांगितले. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन हे भारतीय कंपन्यांसाठी विशेषत: वित्तीय बाजार आणि आयटी कंपन्यांसाठी चांगली बातमी देतील, अशी बाजाराला अपेक्षा आहे.
या कंपन्यांचे वधारले-घसरले शेअर
इंडसइंड बँकेचे सर्वाधिक ५ टक्क्यांनी शेअर वधारले. दिवीस लॅब्स, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक आणि अॅक्सिस बँकेचे शेअर निफ्टीमध्ये वधारले. मारुती सुझुकी, डॉ. रेड्डीज लॅब्स, सिप्ला, अदानी पोर्टस व आयटीसी या कंपन्याचे शेअर घसरले.
विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी नोव्हेंबरच्या पाच सत्रात ८,३८१ कोटी रुपयांची भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर २.२६ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल ४०.३४ डॉलर आहेत.