मुंबई - नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबई शेअर बाजार आणि निफ्टीने निर्देशांकाचा नवा विक्रम केला आहे. आयटी, ऑटोसह एफएमसीजी कंपन्यांचे शेअर वधारले.
सलग पाचव्या सत्रात मुंबई शेअर बाजारासह निफ्टीचा निर्देशांक उंचावला आहे. शेअर बाजाराचा निर्देशांक ११७.६५ अंशाने वधारून ४७,८६८.९८ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक सलग आठव्या सत्रात उंचावला. निफ्टीचा निर्देशांक २२ डिसेंबरपासून ५ टक्क्यांनी वधारला.
निफ्टीचा निर्देशांक दिवसाखेर १४,०१८.५० वर स्थिरावला. हा आजपर्यंतचा निफ्टीचा उच्चांक आहे. निफ्टीने आजपर्यंतचा १४,०४९.८५ हा उच्चांक दिवसभरात गाठला. तर शेअर बाजाराने ४७,९८०.३६ हा नवा उच्चांक गाठला.
हेही वाचा-विमान इंधनाच्या किमतीत ३.७ टक्क्यांची वाढ; एलपीजी 'जैसे थे'
या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर
प्रमुख कंपन्यांमध्ये आयटीसीचे सर्वाधिक २.३२ टक्क्यांनी शेअर वधारले. त्यापाठोपाठ टीसीएस, एम अँड एम आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे शेअर वधारले. टीसीएसचे शेअर २.०२ टक्क्यांनी वधारले. टेक महिंद्राचे शेअर ०.२३ टक्के, इन्फोसिसचे शेअर ०.३६ टक्के, एचसीएल टेकचे शेअर ०.४३ टक्क्यांनी वधारले. डॉ. रेड्डीज, एल अँड टी, सन फार्मा, अॅक्सिस बँक, इंडसइंड बँक, नेस्ले आणि अल्ट्राटेकचे शेअर वधारले. आयसीआयसीआय बँकेचे शेअर १.३६ टक्के तर एचडीएफसी बँकेचे शेअर ०.८३ टक्क्यांनी घसरले.
हेही वाचा-फ्लिपकार्टसह अॅमेझॉनवर कारवाईचे ई़डीला केंद्राकडून आदेश
गेल्या वर्षभरात शेअर बाजार आणि निफ्टीचा निर्देशांक हा सुमारे १६.३ टक्क्यांनी वधारला. दरम्यान, जगभरातील शेअर बाजार नवीन वर्षानिमित्त आज बंद राहिले आहेत.