मुंबई - सकाळच्या सत्रात मुंबई शेअर बाजार आणि निफ्टीचा निर्देशांक घसरला. अमेरिका-चीनमधील व्यापारी कराराबाबतची अनिश्चितता आणि आशियातील शेअर बाजारांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेअर बाजार खुला होताच निर्देशांक घसरला.
भारतीय रिझर्व्ह बँकेचे पतधोरण ५ डिसेंबरला जाहीर होणार आहेत. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदार सावध पवित्रा घेत आहेत. मुंबई शेअर बाजार सकाळच्या सत्रात ११९.४२ अंशाने घसरून ४०,५५६.०३ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक ३६.९० अंशाने घसरून ११,९५७.३० वर पोहोचला.
हेही वाचा-एचडीएफसीची नेट बँकिग, मोबाईल अॅप सेवा सलग दुसऱ्या दिवशी बंद.. ग्राहकांना मनस्ताप
शेअर बाजाराच्या आकेडवारीनुसार विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी १ हजार १३१.१२ कोटींच्या शेअरची मंगळवारी विक्री केली. व्यापार करारासाठी चीनला अमेरिकेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणूक २०२० पर्यंत वाट पाहावी लागेल, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. या विधानामुळे गुंतवूकदार चिंतेत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मंगळवारी मुंबई शेअर बाजार १२६.७२ अंशाने घसरून ४०,६७५.४५ वर स्थिरावला होता. तर निफ्टीचा निर्देशांक ५४ अंशाने घसरून ११,९९४.२० वर स्थिरावला होता.
हेही वाचा-हवाला चौकशी : प्राप्तिकर विभागाची काँग्रेसला नोटीस