मुंबई - शेअर बाजाराने बंद होण्यापूर्वी आजपर्यंतचा सर्वोच्च असा ४०,३०८ निर्देशांक गाठला आहे. त्यापूर्वी निर्देशांक हा ५५३ अंशाने वधारला. निफ्टीतही ११६ अंशाची वाढ होवून निर्देशांक १२,१०३.०५ वर पोहोचला. आरबीआयची पतधोरण समिती गुरुवारी रेपो दरात कपात करण्याची शक्यता आहे. यामुळे शेअर बाजारात सकारात्मक वातावरण दिसून आले.
शेअर बाजाराने ५९८ अंशाची उसळी घेतली होती. त्यानंतर ५५३.४२ अंशावर स्थिरावरून निर्देशांक ४०,२६७.६२ वर पोहोचला.
या कंपन्यांचे शेअर घसरले-वधारले
हिरो मोटोकॉर्प, बजाज ऑटो, एशियन पेंट्स, इंडुसलँड बँक, एचयूएल आणि मारुती या कंपन्यांच्या शेअरमध्ये ५.८७ टक्क्यांनी वधारले आहेत. तर आयसीआयसीआय बँक, एनटीपीसी आणि आयटीसीचे शेअर ०.१३ टक्क्यांनी घसरले आहेत. रुपया डॉलरनेच्या तुलनेत ३८ पैशांनी वधारून ६९.३२ वर पोहोचला. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीदरम्यान जीडीपीने गेल्या पाच वर्षातील निचांक नोंदविल्याची आकडेवारी समोर आली होती. अशा निराशाजनक स्थितीत आरबीआयची पतधोरण समिती गुरुवारी रेपो दरात कमी करण्याची शक्यता आहे.