ETV Bharat / business

सलग पाचव्या सत्रात शेअर बाजाराची पडझड सुरुच, निर्देशांक ३२४ अंशाने घसरला

आयसीआयसीआय बँक आणि भारती एअरटेलची तिमाहीदरम्यानची आकडेवारी गुंतवणुकदारांना आकर्षित करू शकली नाही. दोन्ही कंपन्यांच्या शेअरची विक्री होताना दिसून आली. शेअर बाजाराच्या निर्देशांकात ३२४ अंशाने घसरून होऊन बाजार ३८,२७६ वर बंद झाला

मुंबई शेअर बाजार
author img

By

Published : May 7, 2019, 7:27 PM IST

मुंबई - सलग पाचव्या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ३२४ अंशाने घसरण झाली आहे. चीन-अमेरिकेतील व्यापारी संबंध ताणले जात असताना आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या तिमाहीदरम्यान मंदावलेले निकाल याचा शेअर बाजारावर नकारात्मक परिणाम झाला आहे.

आयसीआयसीआय बँक आणि भारती एअरटेलची तिमाहीदरम्यानची आकडेवारी गुंतवणुकदारांना आकर्षित करू शकली नाही. दोन्ही कंपन्यांच्या शेअरची विक्री होताना दिसून आली. शेअर बाजाराच्या निर्देशांकात ३२४ अंशाने घसरून होऊन बाजार ३८,२७६ वर बंद झाला. तर निफ्टीच्या निर्देशांकातही १०० अंशाची घसरण झाली. निफ्टी ११, ४९७.९० वर बंद झाला. गेली काही दिवस भारतीय बाजारपेठ (मार्केट) अस्थिर झाली आहे. कारण चीन आणि अमेरिकेमध्ये होणाऱ्या व्यापारी तडजोडीबाबत संदिग्धता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच कार्पोरेट कंपन्यांच्या तिमाही आकडेवारीही उत्साहवर्धक नसल्याचे सेंट्रम ब्रोकिंगचे सिनिअर व्हीपी जगन्नाधाम धुनुगुंटला यांनी सांगितले.

शेअर बाजार आज सकाळच्या सत्रात सावरून निर्देशांकात १७० अंशाची वाढ झाली होती. तर निफ्टीचा निर्देशांक ३८.७० अंशाने वधारला होता. बँकिंग आणि आयटी कंपन्यांच्या शेअरमुळे हा सकारात्मक परिणाम दिसून आला होता.

Intro:आयसीएसईच्या परीक्षेत सलग तिस-या वर्षीही मुंबईचाच दबदबा कायमBody:आयसीएसईच्या परीक्षेत सलग तिस-या वर्षीही मुंबईचाच दबदबा कायम
दहावीत जुहूच्या जमनाबाई नरसी स्कूलची जुही कजारिया देशात पहिली तर दुसऱ्या स्थानावर मुंबईतील चार विद्यार्थ्यांचा समावेश
बारावीत कोलकात्याचा देवांग अग्रवाल प्रथम, मुंबईची मिहिका सामंत दुसरी
मुंबई, ता, 7:

कौन्सिल फॉर दी इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (आयसीएसई) या शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या (आयसीएसईत)दहावी आणि (आयएससी)बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाले.
आयसीएसई(दहावी)चा एकुण निकाल ९८.५४ टक्के तर आयएससी(बारावी)चा ९६.५२ टक्के इतका लागला आहे. मागील निकालाच्या तुलनेत यंदा ०.३ टक्के निकालात वाढ झाली असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले.
मागील तीन वर्षांनंतरही आयसीएसईच्या परीक्षेत मुंबई विभागाने आपला दबदबा कायम ठेवला असून यात आयसीएसईत म्हणजेच दहावीत जुहूतील जमनाबाई नरसी स्कूलची जुही कजारिया ही देशात टॉपर ठरली असून त्याच शाळेतील फोरम संजनावाला, कांदिवलीतील गुंडेचा एज्युकेशन अकॅडमीतील अनुश्री चौधरी, ठाण्यातील सुलोचना देवी सिंघानिया स्कूलमधील यश भन्साळी आणि मुंबईतील चिल्ड्रेन अकॅडमीतील अनुष्का अग्निहोत्री हे देशात दुस-या क्रमांकाचे टॉपर ठरले आहेत. तर नाशिक येथील विझडम इंटरनॅशनल स्कूलमधील दृष्टी अत्तारडे ही देशातील टॉपरमध्ये तिस-या स्थानावर आली आहे.
बारावीच्या म्हणजेच आयएससीच्या परीक्षेत देशात कोलकात्याचा देवांग अग्रवाल प्रथम, मुंबईची मिहिका सामंत दुसरी आली आहे. तर या परीक्षेतील टॉपरमध्ये मुंबईची यंदा थोडीशी घसरण झाल्याचेही समोर आले आहे.
( राज्यातील आकडेवारी आल्यास ती पुन्हा पाठवणार आहे)
Conclusion:आयसीएसईच्या परीक्षेत सलग तिस-या वर्षीही मुंबईचाच दबदबा कायम
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.