मुंबई - मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात सकाळच्या सत्रात मोठी पडझड झाली आहे. शेअर बाजाराच्या निर्देशांकात ३२५ अंशानी घसरण होऊन निर्देशांक ३७,८४५ वर पोहोचला आहे. तर निफ्टीच्या निर्देशांकातही 103 अंशाची घसरण झाली.
स्थावर मालमत्ता, धातू, ऑटो या क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर १.५७ टक्क्यापर्यंत घसरले. गेली आठ दिवस शेअर बाजाराचा निर्देशांक वधारलेला होता. यामध्ये गुंतवणुकदारांनी नफा मिळविला. मात्र शुक्रवारी रुपयाची डॉलरच्या तुलनेत मोठी घसरण झाल्याने आणि जागतिक बाजारपेठेतील बदल झाले. त्यामुळे गुंतवणुकदारांनी शेअरची आज विक्री केली. वेदांता, सन फार्मा, टाटा स्टील, कोटक बँक, एसबीआय, टाटा मोटर्स, आरआयएल, आयसीआयसीआय बँक, येस बँक, एचडीएफसी या कंपन्यांचे शेअर २.१६ टक्क्यापर्यंत घसरले. शेअर घसरलेल्या कंपन्यांमध्ये अॅक्सिस बँक, एम अँड एम, इन्डूसलँड बँक, आयटीसी लि. एचसीएल टेक, बजाज ऑटो, एचडीएफसी बँक, इन्फोसिस बँक यांचाही समावेश आहे.
शुक्रवारी देशातील गुंतवणुकदार संस्थांनी ६५७.३७ कोटी शेअरची विक्री केली. तर विदेशी गुंतवणुकदार संस्थांनी १३७४.५७ कोटी एवढ्या मुल्य असलेल्या विविध शेअरची खरेदी केली होती. अमेरिका आणि युरोपमध्ये उत्पादन कमी झाल्याने जगभरात आर्थिक प्रगती मंदावण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
Conclusion: