ETV Bharat / business

शेअर बाजार निर्देशांकात २०० अंशांची पडझड; आयसीआयसीआय बँकेच्या शेअरमध्ये घसरण - Share Market today

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक २०२.४४ अंशांनी घसरून ३९,६८६.५२ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक ६२.७५ अंशांनी घसरून ११,६१५.७५ वर पोहोचला.

Bombay Stock Exchange
मुंबई शेअर बाजार
author img

By

Published : Feb 27, 2020, 12:05 PM IST

मुंबई - शेअर बाजार खुला होताना निर्देशांक २०० अंशांनी घसरला आहे. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी भांडवली बाजारातून काढलेला निधी आणि कोरोनाची टांगती तलवार या कारणांनी जागतिक गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक २०२.४४ अंशांनी घसरून ३९,६८६.५२ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक ६२.७५ अंशांनी घसरून ११,६१५.७५ वर पोहोचला.

या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर

एचसीएल टेक, एचडीएफसी बँक, टीसीएस, एम अँड एम, इंडसइंड बँक, सन फार्मा, आयसीआयसीआय बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर घसरले आहेत. तर दुसरीकडे टायटन, एनटीपीसी, नेस्ले इंडिया आणि कोटक बँकेचे शेअर वधारले आहेत.

हेही वाचा- शेतकऱ्यांना दिलासा..! सरकारने कांदा निर्यात बंदी उठवली

मागील सत्रात मुंबई शेअर बाजार ३९२.२४ अंशांनी घसरून ३९,८८८.९६ अंशांवर स्थिरावला होता. तर निफ्टीचा निर्देशांक ११९.४० अंशांनी घसरून ११,६७८.५० अंशांवर स्थिरावला होता.

हेही वाचा-एजीआर शुल्क : व्होडाफोन आयडियाने सरकारकडे 'या' केल्या मागण्या

बाजार विश्लेषकांच्या मते, कोरोनाचा जगभरात प्रसार वाढत असल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंता आहे. जागतिक आर्थिक मंचावर अस्थिरता असल्याने विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी भांडवली बाजारामधून निधी काढून घेण्याचे प्रमाण वाढले आहे.

विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी ३,३६.६० कोटी रुपयांच्या शेअरची बुधवारी विक्री केली. तर देशातील गुंतवणूकदार संस्थांनी २,७८५.६७ कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली आहे. ब्रेन्ड क्रुड ऑईल फ्युचुअरच्या प्रति बॅरलचा दर हा १.११९ टक्क्यांनी घसरून ५२.१८ डॉलरवर पोहोचला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.