मुंबई - शेअर बाजार सकाळच्या २०० अंशाच्या पडझडीनंतर अजून सावरला नाही. विक्रीच्या दबावातून दुपारनंतर शेअर बाजार निर्देशांकात ४९६ अंशाची घसरण झाली आहे. येस बँकेच्या शेअरमध्ये सर्वात अधिक १२ टक्क्यांची घसरण झाली आहे.
मुंबई शेअर बाजार निर्देशांक दुपारी दोन वाजता ४९६ अंशाने घसरून ३६,०६८ वर पोहोचला आहे. निफ्टीचा निर्देशांक १२९ अंशाने घसरून १०,७११ वर पोहोचला.
हेही वाचा-ई-सिगरेट बंदीच्या घोषणेवरून किरण मुझुमदार शॉ यांचा आक्षेप; सीतारामन यांनी 'हे' दिले उत्तर
इंडुसइंड बँक, आयसीआयसीआय बँक आणि अॅक्सिस बँकेच्या शेअरमध्येही घसरण झाली आहे. टाटा स्टीलच्या शेअरमध्ये ४.६ टक्के तर जेएसडब्ल्यूच्या शेअरमध्ये २.३ टक्के घसरण झाली आहे.
हेही वाचा-नीरव मोदी लंडनच्या न्यायालयासमोर व्हिडिओ लिंकने राहणार उपस्थित
इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स कंपनीच्या शेअरमध्ये ७.७ टक्के घसरण झाली. तर वेदांत कंपनीच्या शेअमध्ये ४ टक्के तर रिलायन्स इंस्ट्रीजच्या शेअरमध्ये २.१ टक्के घसरण झाली आहे. टाटा मोटर्स, भारती एअरटेल, एशियन पेंट्स, ब्रिटानिया आणि कोल इंडियाचे शेअर वधारले.
विदेशी गुंतवणुकदारांनी भांडवल सतत काढून घेतल्याने आणि जागतिक अर्थव्यवस्थेमधील संमिश्र स्थितीने शेअर बाजारात पडझड होत आहे.
हेही वाचा-शेअर बाजारात २०० अंशाने पडझड ; टीसीएस, आयसीआयसीआय बँकेंचे घसरले शेअर
निफ्टीच्या सर्वच क्षेत्रातील निर्देशांकात घसरण झाली आहे. निफ्टी माध्यमात ४.६, सरकारी बँक २.४ टक्के, धातू २.७ टक्के तर फार्मा कंपनीच्या निर्देशांकात १.८ टक्के घसरण झाली आहे.