ETV Bharat / business

सेबीने ७ संस्थांवरील रद्द केले निर्बंध - dealers of Reliance Securities

सेबीने ७ संस्थांवर निर्बंध लागू केले होते. या संस्थांनी व्यापारामध्ये अनुचित प्रकार केल्याचा सेबीने दावा केला होता.

सेबी
सेबी
author img

By

Published : Jan 5, 2021, 10:24 PM IST

नवी दिल्ली - सेबीने ७ संस्थांना दिलासा दिला आहे. कारण, सेबीने या संस्थांवरील निर्बंध उठविले आहेत. यामध्ये रिलायन्स सेक्युरिटीजसह इतर संस्थांचाही समावेश आहे.

सेबीने ७ संस्थांवर निर्बंध लागू केले होते. या संस्थांनी व्यापारामध्ये अनुचित प्रकार केल्याचा सेबीने दावा केला होता. सेबीने ३० डिसेंबरला आदेशात म्हटले की, सध्या प्राथमिक दर्शनी कोणतीही सिक्युरिटीच्या बाजारात फसवणुकीची घटना दिसत नाही. त्यामुळे नियन करणाऱ्या संस्थेने ७ संस्थांवरील निर्बंध काढले आहेत. याबाबत पुढील तपास सुरू असल्याचेही सेबीने म्हटले आहे. भारत सी पारेख, एचयूएफ, मानसी व्ही. शाह, प्रवीण सोमानी, बिमल एन. मेहता, जितेंद्र एम. शाह, एचयूएफ, संजय जे. शाह, एचयूएफ आणि शिमोनी एस. शाह या सात संस्थांचा समावेश आहे.

हेही वाचा-संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून; सीसीपीएने दिले संकेत

सेबीने अंतिरम आदेशात ऑगस्टलला २७ संस्थांवर निर्बंध लागू केले होते. त्यामधील 7 संस्था भांडवली बाजाराशी संबंधित आहेत. यामधील बहुतांश डीलर हे रिलायन्स सिक्युरिटीजचे आहेत. या संस्थांना निर्बंधामुळे भांडवली बाजारात व्यवहार करण्यावर मनाई करण्यात आली होती.

हेही वाचा- आरबीआयकडून 'बजाज'ला २.५ कोटींचा दंड

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.